ताज्या बातम्या

EPFO Tax : पीएफ काढताना किती कर भरावा लागतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती

कर्मचारी, निवृत्तीवेळीच नाही तर बेरोजगार असताना, वैद्यकीय गरज, लग्न आणि घर बांधकाम यासाठी आणि इतर आपत्कालीन परिस्थितीत पूर्ण अथवा आंशिक पैसे काढू शकतात.

Published by : Varsha Bhasmare

केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती बचत योजना चालवते. कर्मचारी, निवृत्तीवेळीच नाही तर बेरोजगार असताना, वैद्यकीय गरज, लग्न आणि घर बांधकाम यासाठी आणि इतर आपत्कालीन परिस्थितीत पूर्ण अथवा आंशिक पैसे काढू शकतात. पण या योजनेतून पैसे काढण्यासाठी काही नियम आहेत. PF निधीतून पैसे काढणे हे करपात्र आहे. पण पीएफमधून पैसे काढण्यासाठी किती आणि केव्हा कर लागतो हे तुम्हाला माहिती आहे का?

PF काढण्याविषयी काय नियम?

सेवानिवृत्तीनंतर ईपीएफ खात्यातील सर्व रक्कम काढता येते. ईपीएफने निवृत्तीचे वय 55 वर्षे निश्चित केले आहे.

कर्मचारी सेवानिवृत्तीच्या एक वर्ष अगोदर या खात्यातून 90 टक्के रक्कम काढू शकतात.

जर कर्मचारी एक महिन्यांच्या बेरोजगारीनंतर खात्यातून 75 टक्के रक्कम काढू शकतात. तर उर्वरीत रक्कम नवीन नोकरी लागल्यानंतर व्यक्तीच्या पीएफ खात्यात हस्तांतरीत होते.

दोन महिने बेरोजगार असले तर व्यक्ती ईपीएफमधून संपूर्ण रक्कम काढू शकतो.

Aadhar जर UAN शी जोडलेला असेल आणि कंपनीने त्याला मान्यता दिली असेल तर ऑनलाईन मंजुरी मिळते आणि कर्मचाऱ्याला केव्हाही त्याची ईपीएफ रक्कम काढता येते.

पीएफ काढल्यावर TDS कापला जातो

जर तुम्ही भविष्य निर्वाह निधीमधून काही पैसे काढले आणि काही रक्कम अतिरिक्त कापल्या गेल्याचे तुमचा लक्षात आले असेल तर हे TDS कपातीमुळे होते. जेव्हा तुम्ही 5 वर्षांची सलग सेवा पूर्ण करण्यापूर्वी पीएफमधून पैसे काढता तेव्हा त्यातील काही भाग टीडीएस म्हणून कापल्या जातो.

50,000 रुपयांपर्यंत पीएफ काढणे करमुक्त आहे का?

जर तुम्ही सलग 5 वर्षांची सेवा पूर्ण करण्याआधी ईपीएफमधून पैसे काढले तर त्या रक्कमेवर कर आकारला जातो. पण जर तुम्ही 50,000 रुपयांपेक्षा कमी रक्कम काढली तर त्यावर कोणताही टीडीएस कापल्या जात नाही. या कालावधीत तुम्ही दोन नोकऱ्या केल्या तरी त्याची बेरीज 5 वर्षे असणे आवश्यक आहे. तुम्ही एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत गेला आणि पाच वर्षांची सेवा पूर्ण केली. सर्व रक्कम हस्तांतरीत केली. तर अशावेळी कोणताही टीडीएस कापल्या जात नाही. पण पाच वर्षांपेक्षा कमी सेवा भरली तर मात्र या नियमातंर्गत सवलत मिळणार नाही. तुम्ही फॉर्म 26AS मध्ये किती टीडीएस कापण्यात आला आणि आयकर रिटर्न दाकल करताना त्यावर दावा करू शकता. ही रक्कम तुम्हाला परत मिळू शकते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा