ताज्या बातम्या

समृद्धी महामार्गावर तुम्हाला किती टोल भरावा लागणार? जाणून घ्या

Published by : Siddhi Naringrekar

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गचं उद्घाटन 11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत.मुंबई ते नागपूर हा समृद्धी महामार्ग आहे. नागपूर ते शिर्डीपर्यंतचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. हा मार्ग १० जिल्ह्यांतील ३९२ गावांमधून धावेल आणि दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ सात तासांपर्यंत कमी करेल. 11 तारखेनंतर सामान्य नागरिकांसाठी समृद्धी महामार्ग खुला होणार आहे. महाराष्ट्रासाठी बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाचं उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.

नागपूरपासून शिर्डीपर्यंतचा समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा सध्या सुरू होत आहे. या पहिल्या टप्प्यात 19 टोलबूथ आहेत. छोट्या चार चाकी वाहनांसाठी प्रति किमी 1 रुपये 73 पैसे टोल निश्चित करण्यात आला आहे. म्हणजे नागपूर ते शिर्डी पर्यंतचे 520 km अंतराकरिता 900 रुपये टोल भरावा लागणार आहे. तर मुंबई पर्यंतच्या 701 किमीच्या प्रवासासाठी साधारण पणे बाराशे रुपयांचा टोल लागणार आहे. हलक्या व्यावसायिक किंवा मालवाहतुकीच्या वाहनांसाठी 2 रूपये 79 पैसे प्रति किमीचा दर राहणार आहे. बस अथवा ट्रक या वाहनांसाठी 5 रूपये 85 पैसे प्रति किमीचा दर राहणार आहे. मोठ्या व्यावसायिक वाहनांना 6 रूपये 38 पैसेच्या दराने टोल द्यावा लागणार आहे.

समृद्धी महामार्गावर फक्त एक्झीट पॉईंटवरच टोल बूथ असणार आहेत. समृद्धी महामार्गावर नागपूरपासून मुंबईपर्यंत एकूण 26 टोल बूथ असणार आहे. मात्र सध्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्यात 19 टोलबूथ कार्यरत होणार आहेत. समृद्धी महामार्गावर दुचाकी, तीनचाकी आणि ट्रॅक्टरला प्रवासाची परवानगी मिळणार नाही.

Cards: पत्ते खेळण्याने होतात 'हे' आरोग्यदायी फायदे

CSK vs RCB : सामन्यात पावसाने खोडा घातल्यास बंगळुरुच्या अडचणी वाढणार? काय आहे समीकरण? जाणून घ्या

"२० तारखेला निवडणूक होऊद्या, २१ तारखेला मिटिंग लावतो आणि..."; नाशिकच्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

Carrom: कॅरम खेळल्याने होतात हे शारीरिक फायदे! जाणून घ्या...

Chess: बुद्धिबळ खेळण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या...