ताज्या बातम्या

Smartphone Safety Tips : स्मार्टफोन overheat होतोय? मगं ते होण्यापासुन थांबवावं कसं, जाणून घ्या

अनेकदा फोन इतका गरम होतो की, फोनची कार्यक्षमता आणि बॅटरी लाइफसाठी देखील हानिकारक ठरू शकते. अशा वेळी फोन कसा थंड करावा, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

Published by : Prachi Nate

आजच्या दैनंदिन जीवनात अन्न वस्त्र निवारा या बरोबर च आता स्मार्टफोन ही अत्यावश्यक गरज बनली आहे. स्मार्टफोन हे आता केवळ स्टाईल स्टेटमेंट नसुन दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग झाली आहे.मात्र उन्हाळ्यात अनेकदा स्मार्टफोन तापतो. उन्हाळ्यात तापमान वाढल्याने स्मार्टफोन गरम होण्याची समस्याही वाढते. अनेकदा फोन इतका गरम होतो की, फोनची कार्यक्षमता आणि बॅटरी लाइफसाठी देखील हानिकारक ठरू शकते. अशा वेळी फोन कसा थंड करावा, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

  • नेटवर्क कमी असल्यास फ्लाइट मोड ऑन करा

    नेटवर्क सिग्नल कमी असल्यामुळे अनेक वेळा स्मार्टफोन जास्त पॉवर वापरू लागतो. डिव्हाइसला कनेक्ट ठेवण्यासाठी फोन जास्त मेहनत करतो, ज्यामुळे ओव्हरहीटिंग होते. अशा वेळी तुम्ही फोनचा फ्लाइट मोड एकदा ऑन करून नंतर बंद केला, तर फोनवरील दाबही थोडा कमी होतो.

  • लाइव्ह वॉलपेपर बंद करा

    जर तुम्ही तुमच्या फोनला स्मार्ट देण्यासाठी लाइव्ह वॉलपेपर किंवा ॲनिमेटेड बॅकग्राउंड वापरत असाल, तर उन्हाळ्याच्या दिवसात असे करू नका कारण हे लाईव्ह वॉलपेपर व्हिज्युअल सीपीयू आणि रॅमला सतत सक्रिय ठेवतात. ज्यामुळे फोन लवकर गरम होऊ शकतो.

  • थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात नेणे टाळा

    जेव्हा तुमचा फोन थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येतो तेव्हा तो पटकन गरम होऊ शकतो. त्यामुळे तुमचा फोन थेट सूर्यप्रकाशात न ठेवण्याचा प्रयत्न करा. बाहेर असाल तर खिशात किंवा बॅगेत ठेवा. डॅशबोर्डवर किंवा कारमधील खिडकीजवळ फोन ठेवणे टाळा.

  • गेम्सचा वापर कमी करा

    हेव्ही अ‍ॅप्स आणि गेम्सचा वापर कमी करणे. हाय ग्राफिक्स गेम्स किंवा हेवी अ‍ॅप्स प्रोसेसरवर जास्त लोड टाकू शकतात, ज्यामुळे फोन गरम होऊ शकतो. जर तुमचा फोन वारंवार ओव्हरहीट होत असेल तर अशा अ‍ॅप्सचा वापर कमी करा.

  • चार्जिंग करताना फोन वापरणे टाळा

    चार्जिंग दरम्यान फोन वापरल्याने तो जास्त गरम होऊ शकतो. चार्जिंगच्या वेळी फोन आधीच थोडा गरम असतो आणि यादरम्यान जर तुम्ही फोन चा वापर केला तर तो आणखी गरम होऊ शकतो. त्यामुळे चार्जिंग दरम्यान फोन वापरणे टाळा.. फोन कधीही उशी किंवा रजाईखाली ठेवून चार्ज करू नका.

  • फोनचे सॉफ्टवेअर अपडेट ठेवा

    कंपन्या वेळोवेळी सॉफ्टवेअर अपडेट्स ची इन्फो पाठवत असतात जे कार्यक्षमता सुधारतात आणि उष्णतेच्या समस्या कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे सॉफ्टवेअर अपडेट्स तपासा आणि उपलब्ध असल्यास ते इन्स्टॉल करा.

  • कव्हर न वापरणे

    अतिउष्णता कमी करण्याचा आणखी एक प्रभावी मार्ग आहे आणि तो म्हणजे फोनची केस कमी करणे किंवा न वापरणे. काही जाड आणि घट्ट फिटिंग फोन केसेस फोनची उष्णता बाहेर जाण्यापासून रोखू शकतात. जर तुमचा फोन खूप गरम झाला असेल तर केस काढुन टाका.

  • बॅकग्राऊंड अ‍ॅप्स बंद करा

    बॅकग्राऊंडमध्ये चालणारे अनेक अ‍ॅप्स आपण अनेकदा ओपन करून सोडतो. , ज्यामुळे फोन गरम होऊ शकतो. त्यामुळे वापरानंतर बॅकग्राऊंडमध्ये चालणारे अ‍ॅप्स बंद करा.आपण वापरत नसलेले कोणतेही अ‍ॅप्स बंद करा. विशेषतः लोकेशन सर्व्हिसेस, ब्लूटूथ आणि Wi-Fi सारख्या सेवा गरज असेल तेव्हाच चालू करा.अश्या काही टिप्स वापरून तुम्ही स्वतःचा फोन जास्त गरम होण्यापासुन वाचवू शकता. आणि फोन चे आयुष्य वाढवू शकता.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस