ताज्या बातम्या

How To Cancel Autopay : गुगल Pay वरील 'Autopay' सेवा कशी बंद कराल?

गूगल पे Autopay: गूगल पेवर ऑटोपे सेवा कशी बंद करावी, जाणून घ्या सोपी प्रक्रिया.

Published by : Team Lokshahi

गूगल पे Googlepay हे केवळ डिजिटल पेमेंट अ‍ॅप नसून, तुमच्या आर्थिक व्यवहारांचं व्यवस्थापन करणारे एक प्रभावी माध्यम आहे. मात्र, यामधील Autopay’ ही सोय काही वेळा नको असते. त्यावेळी पैसे वळते करते, विशेषतः जर एखादं subscription सब्सक्रिप्शन विसरूनही सुरू राहिलं असेल, तर!

Autopay म्हणजे नेमकं काय?

ही सेवा विविध बिलं भरण्यासाठी असते , उदा. वीज, मोबाईल, OTT प्लॅटफॉर्म्स किंवा कर्जहप्ते. दरवेळी मॅन्युअली भरण्याऐवजी पैसे आपल्या खात्यातून आपोआप कट होतात. परंतू वेळ निघून गेल्यावर आपल्याला लक्षात येतं की, ही सेवा आपल्यासाठी उपयुक्त न राहता त्रासदायक ठरते आहे.

गूगल पेवरील ऑटोपे बंद कसं करावं?

1. गूगल पे अ‍ॅप उघडा.

2. प्रोफाइल आयकॉनवर टॅप करा.

3. ‘Autopay’ हा पर्याय निवडा.

4. सक्रिय असलेली सर्व ऑटोपे यादी दिसेल, गरजेचा पर्याय निवडा.

5. ‘Cancel Autopay’ वर क्लिक करा.

6. त्यानंतर UPI PIN टाकून पुष्टी करा.

या प्रक्रियेनंतर तुम्हाला Autopay बंद झाल्याचा मेसेज मिळेल.

लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी:

काही सेवांमध्ये Autopay बंद केल्यानंतरही संबंधित कंपनीशी संपर्क करावा लागू शकतो.

जर एखादं पेमेंट आधीच नियोजित (scheduled) असेल, तर ते पूर्ण होऊ शकतं.

ॲप App अपडेट केलेलं असल्याची खात्री करा. काही वेळा नवीन फिचर्स जुन्या आवृत्तीत दिसत नाहीत.

काही विशेष सेवा (जसं कर्जाचे हप्ते) थेट गूगल पेवर बंद करता येत नाहीत – त्यासाठी मर्चंटकडे संपर्क साधावा लागतो.

अडचण आल्यास काय कराल?

UPI PIN टाकूनही काही वेळा प्रक्रिया अडकते. अशा वेळी बँक खाते पुन्हा लिंक करा आणि प्रयत्न करा.

‘Get Help’ पर्यायातून सपोर्ट टीमशी संपर्क साधा आणि समस्या नोंदवा.

महत्त्वाचा सल्ला:

गूगल पे किंवा इतर कोणतेही अ‍ॅप्स केवळ अधिकृत अ‍ॅप स्टोअरवरूनच डाउनलोड करा. बनावट अ‍ॅप्सपासून सावध रहा आणि तुमचे डिजिटल व्यवहार सुरक्षित ठेवा.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा