संध्याकाळच्या जेवणात काहीतरी खास आणि झणझणीत खायचं असेल, तर कोकणची चव असलेला भरलेला बांगडा नक्की करून पाहा. आंबट-तिखट मसाल्याने भरलेला हा मासा दिसायलाच नाही, तर चवीला देखील अफलातून लागतो.
बांगडा हा अनेकांचा आवडता मासा असून तो आरोग्यासही फायदेशीर आहे. रोजच्या बांगडा फ्रायपेक्षा थोडं वेगळं बनवायचं असेल, तर हा पदार्थ उत्तम पर्याय ठरतो.
साहित्य
बांगडा,
खोबऱ्याचा किस,
कांदा,
चिंच किंवा कोकम,
तिखट,
आलं-लसूण,
मीठ,
रवा,
तांदळाचं पीठ आणि कोथिंबीर.
कृती
मासा स्वच्छ करून मसाले लावून ठेवा. खोबरे, चिंच, आलं-लसूण आणि हिरवी मिरची वाटून घ्या. कांदा परतून त्यात हे वाटण घालून छान भाजा. हा मसाला बांगड्यात भरून रवा-तांदळाच्या पीठात घोळवा आणि तेलात सोनेरी होईपर्यंत तळा. गरमागरम भरलेला बांगडा भाकरी किंवा भातासोबत दिला, तर संध्याकाळचं जेवण एकदम खास होईल.