ताज्या बातम्या

'एकुलत्या एक मुलाचं संगोपन कसं कराल?'; जाणून घ्या यशस्वी पालकत्वाचे नियम

आधुनिक काळात कुटुंबाची रचना बदलताना दिसत आहे. आधीच्या काळात चार-पाच मुलं असणं हे सामान्य होतं, तर आज अनेक दांपत्य फक्त एकच मूल होण्याचा निर्णय घेत आहेत.

Published by : Rashmi Mane

आधुनिक काळात कुटुंबाची रचना बदलताना दिसत आहे. आधीच्या काळात चार-पाच मुलं असणं हे सामान्य होतं, तर आज अनेक दांपत्य फक्त एकच मूल होण्याचा निर्णय घेत आहेत. करिअर, आर्थिक स्थैर्य, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि वाढती जबाबदारी यांमुळे ही निवड समाजात अधिकाधिक वाढताना दिसते. मात्र, एकुलत्या एक मुलाचा संगोपन करताना पालकांनी अधिक जाणिवपूर्वक आणि समतोल दृष्टिकोन बाळगणं गरजेचं आहे. कारण अशा मुलांच्या विकासात अनेक भावनिक आणि सामाजिक बाजू अधिक प्रभावी असतात.

1. सामाजिक नातेसंबंधांची उभारणी, एक गरज, नुसती इच्छा नव्हे

एकुलतं एक मूल असताना ते भावंडांच्या सहवासातून वंचित राहतं. त्यामुळे त्याला लहान वयापासून मित्रमंडळी, शेजारी, शाळा उपक्रम आणि खेळांच्या माध्यमातून 'समूह भावना' शिकवणं अत्यावश्यक आहे. एखाद्या मुलाच्या विकासासाठी जितकं पुस्तक वाचणं गरजेचं आहे, तितकंच मैत्री करणं आणि शेअरिंगही गरजेचं आहे.

2. विनोद आणि आनंददायी वातावरण, गंभीरपणातही थोडं हास्य हवं

एकुलत्या एक मुलं बऱ्याचदा परिपक्व आणि जबाबदार असतात, पण त्यांचं बालपण हरवू नये याची काळजी पालकांनी घ्यायला हवी. घरात हास्याचं, संवादाचं आणि चुकांना स्वीकारण्याचं वातावरण ठेवा. कधीकधी आई-वडिलांनीही बालिशपणा करावा. कारण ते क्षणच मुलांच्या आठवणीत आयुष्यभर जिवंत राहतात.

3. 'सर्व काही मीच करू' ही पालकांची सवय मोडा

अनेक पालक आपल्या एकुलत्या मुलासाठी अतिशय काळजीवाहू असतात. पण हीच काळजी कधी कधी त्यांच्या स्वावलंबनात अडथळा ठरते. घरातल्या छोट्या जबाबदाऱ्या, स्वच्छता, स्वतःचे कपडे, अभ्यासाचे नियोजन यासाठी त्यांना स्वतःहून पायउतार होण्यास शिकवा. हे केवळ स्वावलंबन नव्हे, तर नेतृत्वगुणांचंही बीजारोपण असतं.

4. बालपण 'बालपणासारखंच' जपू द्या

एकुलतं एक मूल असल्याने बरेचदा पालक त्यांना लवकर प्रौढांसारखं वागवू लागतात. कौटुंबिक समस्या, आर्थिक ताणतणाव, मोठ्यांचे मतभेद अशा विषयांपासून मुलांना दूर ठेवा. त्यांना त्यांच्या वयाला साजेशा गोष्टींचाच अनुभव द्या. त्यांचं मत विचारा, पण त्यांना घरचं निर्णयकर्तं बनवू नका.

5. 'परिपूर्ण' बनवण्याचा हट्ट नको, अपयश स्वीकारणं शिकवा

एकुलतं एक मूल असल्यामुळे बऱ्याचदा पालक त्यांच्याकडून परिपूर्णता अपेक्षित करतात. शाळा, स्पर्धा, वागणूक सगळीकडे उत्कृष्ट व्हावं अशी अपेक्षा असते. पण पालकांनी लक्षात घ्यावं,चुका आणि अपयश हे शिक्षणाचे भाग आहेत. त्यांना अपयशातून उभं राहणं शिकवा हेच त्यांचं खरं बळ ठरेल.

थोडक्यात काय?

एकुलतं एक मूल असणं म्हणजे त्या मुलाचं पूर्ण विश्व आपल्या पालकांपुरतं मर्यादित असतं. त्यामुळे पालकांचं प्रत्येक पाऊल, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कृती त्यांच्या मानसिकतेवर परिणाम करत असते. त्यामुळे जाणीवपूर्वक, प्रेमाने आणि समजूतदारपणाने संगोपन करणं हेच एकुलत्या एक मुलाच्या उज्वल भविष्याचं गमक आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nanded : नांदेड जिल्ह्यात पावसाचे थैमान; गोदावरी नदी धोक्याच्या पातळीजवळ

Pune : पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणातील पाच आरोपींना अटक

Asia Cup : भारत-पाकिस्तान सुपर-4 मध्ये पुन्हा आमनेसामने

Latest Marathi News Update live : राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप