आताच्या जीवनशैलीमध्ये इतका बदल झाला आहे की त्यामुळे अगदी लहान वयातच आपले केस पांढरे होतात. वयाची तिशी ओलांडल्यावर पांढरे केस होणे ही एक सामान्य समस्या आहे, जी नैसर्गिकरित्या वाढत्या वयासोबत येते.आपल्या शरीराला पुरेसे पोषण न मिळाल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या केसांवर होतो. अकाली केस पांढरे होतात. मात्र काहीवेळेला अनुवंशिकता, जीवनशैली, किंवा काही आरोग्यविषयक समस्यांमुळे सुद्धा अकाली केस पांढरे होऊ शकतात.
आपल्यापैकी अनेकजण अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. बऱ्याच वेळेला ही समस्या लहान मुलांमध्येही ही समस्या दिसून येते. त्याची विविध करणे असू शकतात. ती पुढीलप्रमाणे
१)शरीरातील हार्मोनल असंतुलनामुळे अकाली केस पांढरे होतात
२)सूर्यप्रकाशाच्या दीर्घकाळ संपर्कामुळे केसांचे नुकसान होते
३) सतत मानसिक तणावामुळे शरीरात मेलिनचा स्तर कमी होतो आणि केस पांढरे होतात.
४)धूम्रपान, केमिकलयुक्त हेयर प्रोडक्ट्स, सारखे सारखे हेयर कलर लावणे , स्ट्रेटनिंग,आणि हार्श शॅम्पूचा वापर यामुळे केस अकाली पांढरे होतात.
५)जसे आपले वय वाढते, तसे केसांच्या कूपांमधील मेलेनिन (रंगद्रव्य) कमी होऊ लागते, ज्यामुळे केस पांढरे होतात.
६)व्हिटॅमिन बी-12, व्हिटॅमिन डी, आणि लोह यांसारख्या व्हिटॅमिनची कमतरता केस पांढरे होण्यास कारणीभूत ठरू शकते.
७)आनुवंशिकता हे सुद्धा अकाली केस पांढरे होण्याचे महत्वाचे कारण असू शकते.
उपाय
वरील कारणांवर मात करून जर आपल्याला आपले केस नैसर्गिकरित्या पुन्हा काळे करायचे असतील तर त्यासाठी एक तेल अत्यंत गुणकारी मानले जाते. यासाठी नारळाच्या तेलात १ सुकाआवळा आणि ५ ते ६ कढीपत्त्याची घेऊन एका लोखंडाच्या कढईमध्ये चांगले उकळवून घ्या. आणि हे तेल जर तुम्ही आठवड्यातून दोन वेळा लावले तर ते अकाली पांढरे झालेले केस काळे होऊ शकतात. केस काळे करण्यासाठी तुम्ही खोबरेल तेल, आवळा पावडर, कढीपत्ता, मोहरीचे तेल आणि तिळाचे तेल वापरू शकता. घरगुती उपायांमध्ये खोबरेल तेलाचाही समावेश करावा कारण खोबरेल तेल केस मजबूत करण्यासाठी तसेच ते काळे करण्यासाठी प्रभावी आहे. केसांना हे तेल पूर्णपणे लावा आणि सुमारे 10 मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. रात्रभर केसांवर राहू द्या. सकाळी केस सौम्य शाम्पूने धुवा. या तेलामुळे तुम्हाला थोड्याच दिवसात केस नैसर्गिकरित्या काळे झालेले दिसतील. आणि या तेलामुळे केसगळतीची समस्या ही नाहीशी होईल.