HSC Board Result 
ताज्या बातम्या

HSC Board Result : ऑल द बेस्ट! आज बारावीचा निकाल, कुठे पाहता येणार निकाल?

HSC Result: आज दुपारी 2 वाजता बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे.

Published by : Pankaj Prabhakar Rane

Maharashtra HSC Board Results : आज बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. दुपारी 2 वाजता निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे. अतिशय मन वर्षभराचा अभ्यास आणि दिलेल्या परीक्षेचा निकाल हाती येणार असल्यामुळं विद्यार्थी आणि पालकांमध्ये आतापासूनच धाकधुक वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

कला, वाणिज्य, विज्ञान आणि तांत्रिक शिक्षणासंबंधीच्या अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल लागल्यानंतर विद्यार्थी पदवी शिक्षणासाठीच्या प्रवेशांसंदर्भातील निर्णय घेऊ शकणार आहेत.

कुठे पाहाल निकाल?

दरम्यान परीक्षांचे निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी https://www.mahahsscboard.in/ या संकेतस्थळाला भेट देणं अपेक्षित असेल. त्यासोबतच mahresult.nic.in, hscresult.mkcl.org आणि mahresults.org.in या लिंकवर जाऊनही निकाल पाहू शकतात.

SMS निकाल कसा पाहाल?

विद्यार्थ्यांना SMS द्वारेही आपला निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना मेसेज बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाकून 57766 या क्रमांकावर सेंड करावा लागणार आहे. यानंतर त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल.

यंदाच्या वर्षी साधारण 14 लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यामुळं आज अर्थानं 14 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य ठरणार आहे. बोर्डाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये सध्या तीन संकेतस्थळांचा उल्लेख करण्यात आला असून, ती वर नमूद करण्यात आली आहेत. या संकेतस्थळांवर कोणत्या विषयांत किती मार्क मिळाले इथपासून विद्यार्थ्यांना निकालाची टक्केवारीही कळणार आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंडळाला किंवा निकालासाठी देण्यात आलेल्या कोणत्याही संकेतस्थळाला भेट दिली असता तिथं त्यांना प्राथमिक माहितीचा तपशील भरून पुढे Marksheet पाहता येईल.

विद्यार्थ्यांनो घाबरू नका...

निकाल पाहण्यासाठी शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर तिथं विद्यार्थानी काळजीपूर्वक सर्व माहिती आणि हॉलतिकीट क्रमांक भरावा. ज्यानंतर पुढच्याच क्षणाला निकाल तुमच्या समोर असेल. पण, निकाल पाहण्यासाठी 14 लाखांहून अधिक विद्यार्थी एकाच वेळी Website ला भेट देणार असल्यामुळं त्यामध्ये काही तांत्रिक अडचणीसुद्धा येऊ शकतात. असं झाल्यास विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता काही वेळानंतर निकाल पाहण्यचा प्रयत्न करावा हेच आवाहन. शिवाय निकाल लागल्यानंतर मनाजोगी टक्केवारी मिळाली नाही, किंवा काहींना यश मिळालं नाही, तरीही निराश होऊ नका!

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा