सोने दराच्या घसरणीला अखेर ब्रेक लागला असून बुधवारी सोन्यात किरकोळ वाढ तर चांदीत मोठी झेप पाहायला मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने–चांदीच्या दरात घसरण सुरू होती. मात्र आज चांदीचा दर तब्बल 1745 रुपयांनी वाढून 1,12,939 रुपये प्रति किलो झाला असून जीएसटीसह हा दर 1,16,327 रुपये इतका आहे. आयबीजेएनुसार जीएसटीशिवाय चांदीचा दर 1,11,194 रुपये किलो इतका नोंदवण्यात आला आहे.
सोन्याच्या दरात मात्र किरकोळ वाढ झाली असून 24 कॅरेट सोन्याचा दर 20 रुपयांनी वाढून 98,946 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. जीएसटीसह या सोन्याचा दर 1,01,934 रुपये प्रति तोळा झाला आहे. 23 कॅरेट सोन्याचा दरही 20 रुपयांनी वाढून 98,570 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला असून जीएसटीसह एका तोळ्याचा दर 1,01,527 रुपये इतका आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 18 रुपयांनी वाढून 90,653 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला असून जीएसटीसह तो 93,372 रुपये प्रति तोळा इतका आहे. तर 18 कॅरेट सोन्याचा दर 15 रुपयांनी वाढून 74,222 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला असून जीएसटीसह तो 76,325 रुपये प्रति तोळा झाला आहे.
8 ऑगस्ट रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 1,01,406 रुपये प्रति तोळा इतक्या उच्चांकावर पोहोचला होता. त्यानंतर सोन्यात तब्बल 2,440 रुपयांची घसरण झाली होती. 2025 मध्ये सोन्याच्या दरात आत्तापर्यंत 23,226 रुपयांची वाढ झाली आहे, तर चांदीच्या दरात 26,922 रुपयांची झेप नोंदली गेली आहे. 31 डिसेंबर 2024 रोजी सोन्याचा दर 75,740 रुपये प्रति तोळा तर चांदीचा दर 86,017 रुपये प्रति किलो इतका होता.
देशातील 10 प्रमुख शहरांमध्ये आजचे दर असे आहेत : नवी दिल्ली आणि लखनौ येथे 22 कॅरेट सोन्याचा दर 92,450 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा दर 1,00,900 रुपये इतका आहे. हैदराबाद, कोलकाता, पुणे, मुंबई, बंगळुरु आणि चेन्नई येथे 22 कॅरेट सोन्याचा दर 92,300 रुपये असून 24 कॅरेट सोन्याचा दर 1,00,750 रुपये आहे. इंदौर आणि अहमदाबाद येथे 22 कॅरेट सोन्याचा दर 92,350 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा दर 1,00,800 रुपये इतका आहे.