ताज्या बातम्या

जिल्हा पोलीस दलाची माणुसकी पुन्हा आली समोर, अंत्यविधीसाठी दिले 4 टन लाकूड

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाला समजताच आपली सामाजिक बांधिलकी जोपासत जिल्हा पोलीस दल यासाठी सरसावल्याचे चित्र.

Published by : Sagar Pradhan

प्रशांत जव्हेरी|नंदूरबार: मनुष्याच्या मृत्यूझाल्यानंतर त्याला मुक्ती मिळते असं आपण नेहमी म्हणत असतो. परंतु,नंदुरबार जिल्ह्यात असा काही प्रकार घडला आहे की, त्यामुळे मरणानंतरही माणसाला मुक्ती मिळेल असं दिसून येत नाही. चक्क मृत्तदेह जाळण्यासाठी लागणार सरनच उपलब्ध नसेल तर कशाप्रकारे मुक्ती मिळेल असा प्रश्न नागरिकांना मध्ये उपस्थित होत आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर नगरपालिका क्षेत्रात असलेल्या स्मशानभूमीत मृतदेह जाळण्यासाठी सरन अर्थात लाकडे नसल्यामुळे मृतदेह ची हेळसांड होत आहे. काही दिवसांवर तीन मृतदेह आले, परंतु जाळण्यासाठी लाकडे नसल्याने मृतदेहाची हेळसांड होत होती. ही गोष्ट नंदुरबार जिल्हा पोलीस दलाला समजताच आपली सामाजिक बांधिलकी जोपासत जिल्हा पोलीस दल यासाठी सरसावल्याचे चित्र नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापुरमधुन समोर येत आहे.

सोमवारी एकाच वेळी तीन मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आले असताना लाकुड नसल्याने मृतदेह बाजुला ठेवुन त्यांच्या कुटुंबीयांना लाकुडाची जमवाजमव करावी लागली होती. याबाबत वृत्त प्रदर्शित होताच. माणुसकीच्या भावनेतुन पोलीस दलाने पुढाकार घेत स्मशानभुमीला ०४ टन लाकुड पुरवले आहे. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी नवापुर पोलीस स्टेशनमध्ये नियुक्तीस असलेल्या आपल्या सहकारी पोलीस मित्रांकडुन वर्गणीद्वारे २० हजारांचा निधी उभाकरुन त्यातुन लाकुड खरेदी करून स्वत: स्मशान भुमीत पोहचवले आहे. यापुढी गरज लागल्यास लाकुड पुरवण्याची तयारी पोलीसांनी दाखवली आहे. पोलीसांनी दाखवलेल्या या माणुसकीच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक देखील होत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Dhanashree Verma : घटस्फोटानंतर धनश्री वर्माच्या गळ्यात कोणाच्या नावाचं मंगळसूत्र? फोटोने वेधलं लक्ष

Latest Marathi News Update live : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

Operation Sindoor : मसूद अजहरच्या कुटुंबाचा अंत! "अन् कुटुंबाचे तुकडे-तुकडे झाले" जैश कमांडरचा मोठा खुलासा

Local Bodies Election Supreme Court : स्थानिक स्वराज्य निवडणुकीबाबत मोठा निर्णय, पुढच्या वर्षी होणार निवडणुक प्रक्रिया; तारीख जाहीर