ताज्या बातम्या

Navneet Rana vs Asaduddin Owaisi : 'ते' वक्तव्य भोवलं! नवनीत राणा यांना हैद्राबाद कोर्टाने बजावला समन्स, हजर राहण्याचे आदेश

भाजपाच्या नेत्या नवनीत राणा यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे.

Published by : Team Lokshahi

भाजपाच्या नेत्या नवनीत राणा यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. नवनीत राणा यांना एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांना दिलेल्या आव्हाना प्रकरणी अडचणी वाढण्याची शक्यता आहे. हैद्राबादला जाऊन नवनीत राणा यांनी खासदार ओवेसी यांना जाहीर आव्हान दिलेल्या वक्तव्याप्रकरणी हैद्राबाद न्यायालयने राणा यांना समन्स पाठवला आहे. तसेच येत्या 28 फेब्रुवारीला त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेशदेखील दिले आहेत.

काय म्हणाल्या होत्या नवनीत राणा?

"ज्या देशाचं नावच हिंदुस्थान आहे, या देशामध्ये हे पाकिस्तानच्या आवलादी येऊन आम्हाला धमकी देत असतील. तर आम्ही उत्तर देण्यास ठाम आहेत. मी माझ्या त्या वक्तव्यावर अजूनही ठाम आहे. तुम्हाला 15 मिनिटं लागत असतील तर आम्हाला फक्त 15 सेकंदच लागतील".

या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर नवनीत राणा यांच्या विरोधात हैद्राबादमध्ये गुन्हा दाखल झाला. याच वादग्रस्त वक्तव्यामुळे नवनीत राणा यांना समन्स पाठवला आहे. ओवेसी यांनी न्यायालयामार्फत दिलेल्या नोटिसीला उत्तर देण्यासाठी नवनीत राणा हैदराबाद कोर्टात 28 फेब्रुवारी रोजी उपस्थित राहणार आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?