गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. यामध्ये धंगेकर हे दररोज मंत्री मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. अशातच जैन बोर्डिंग प्रकरणी धंगेकर यांनी अमित शाहांवरही टीका केली होती.
यावर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रकिक्रिया देताना 12 पक्ष फिरून शिवसेनेत आलेल्या धंगेकरांची अमित शाहांवर बोलण्याची लायकी नाही अशी टीका केली. या वक्तव्यानंतर धंगेकर आणि बन यांच्यात कार्टून वॉर रंगले आहे. नवनाथ बन आणि रवींद्र धंगेकरांमधील शाब्दिक संघर्ष अधिक तीव्र झाल्याचं पाहायला मिळत आहे. मी डोरेमॉन तर तुम्ही बावळट नोबिता.. बन यांनी धंगेकरांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
सोशल मिडीयावर रविंद्र धंगेकर यांनी भाजपा माध्यमप्रमुख नवनाथ बन यांचा फोटो टाकत हा डोरेमॉन कोण आहे..? अशी टिका केलीय. याला उत्तर देत - मी डोरेमॉन असेल तर तुम्ही बावळट नोबिता आहात', धंगेकरांना भाजपा माध्यमप्रमुख नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलय.
नवनाथ बन TWEET
बारा पक्ष फिरून शिवसेनेते आलेले ज्येष्ठ नेते रविंद्रजी धंगेकर यांनी मला ‘डोरेमॉन’ म्हटलं आहे.
पण ते विसरले की डोरेमॉन उपाय शोधतो. लोकांना मदत करतो. त्याच कार्टून सीरीजमध्ये ‘नोबिता’ नावाचं एक पात्र आहे.
तुमच्या म्हणण्यानुसार मी ‘डोरेमॉन’ आहे तर तुम्ही बावळट ‘नोबिता’ आहात.
----------------------
रविंद्रजी धंगेकर TWEET
ते सगळं जाऊ द्या...
मला आधी एक सांगा
हा डोरेमॉन कोण आहे..?