ताज्या बातम्या

Donald Trump : मला नोबेल दिले नाही, आता शांततेची अपेक्षा करू नका, डोनाल्ड ट्रम्प यांचे नॉर्वेच्या पंतप्रधानांना पत्र...

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या नाराजीचा थेट उद्रेक त्यांनी नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गार स्टोरे यांना लिहिलेल्या एका खरमरीत पत्रातून केला आहे

Published by : Varsha Bhasmare

नोबेल शांतता पुरस्कार न मिळाल्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या नाराजीचा थेट उद्रेक त्यांनी नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गार स्टोरे यांना लिहिलेल्या एका खरमरीत पत्रातून केला आहे. “मला नोबेल पुरस्कार दिलेला नाही, त्यामुळे आता माझ्याकडून शांततेची अपेक्षा करू नका,” असे थेट आणि वादग्रस्त विधान ट्रम्प यांनी या पत्रात केल्याची माहिती समोर आली आहे. नोबेल शांतता पुरस्काराची निवड प्रक्रिया नॉर्वेतील नोबेल समितीमार्फत केली जाते. जरी ही समिती औपचारिकरित्या स्वतंत्र असली, तरी नॉर्वे सरकारची भूमिका अप्रत्यक्षपणे महत्त्वाची मानली जाते. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी थेट नॉर्वेच्या पंतप्रधानांनाच लक्ष्य करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

पत्रात ट्रम्प यांनी दावा केला आहे की, त्यांनी आपल्या कार्यकाळात जगातील ८ पेक्षा अधिक संघर्ष आणि युद्धे थांबवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. “मध्यपूर्व, आशिया आणि आफ्रिकेतील अनेक संघर्षांमध्ये मी पुढाकार घेतला. तरीसुद्धा नोबेल समितीने माझा विचार केला नाही,” असा आरोप त्यांनी केला आहे. या दुर्लक्षामुळे आपण अत्यंत अस्वस्थ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. यापुढे शांतता राखण्याची जबाबदारी स्वतःवर नसल्याचे सांगत ट्रम्प यांनी पत्रात म्हटले आहे की, “आता मी केवळ संयुक्त अमेरिकेसाठी काय योग्य आहे, याचाच विचार करणार आहे. जागतिक शांततेसाठी केलेल्या प्रयत्नांचे श्रेय नाकारले गेले, तर अशा अपेक्षा ठेवू नयेत.”

ट्रम्प यांच्या या पत्रामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेक राजनैतिक विश्लेषकांच्या मते, हे विधान केवळ नोबेल पुरस्कारापुरते मर्यादित नसून, अमेरिकेच्या भविष्यातील परराष्ट्र धोरणाबाबतही संकेत देणारे ठरू शकते. काही जणांनी या भूमिकेवर टीका करत, शांततेसारख्या विषयाला वैयक्तिक सन्मानाशी जोडणे धोकादायक असल्याचे मत व्यक्त केले आहे. दरम्यान, नॉर्वे सरकार किंवा पंतप्रधान जोनास स्टोरे यांच्याकडून अद्याप या पत्रावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र ट्रम्प यांच्या या विधानांमुळे नोबेल शांतता पुरस्कार आणि जागतिक राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा