Chhagan Bhujbal : 'जरांगे दरिंदिला भेटायला गेलो...' छगन भुजबळांकडून जरांगेंचा दरिंदी असा उल्लेख Chhagan Bhujbal : 'जरांगे दरिंदिला भेटायला गेलो...' छगन भुजबळांकडून जरांगेंचा दरिंदी असा उल्लेख
ताज्या बातम्या

OBC Maha Elgar Sabha Chhagan Bhujbal : 'जरांगे दरिंदिला भेटायला गेलो...' छगन भुजबळांकडून जरांगेंचा 'दरिंदी' असा उल्लेख

आज बीडमध्ये महा एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे, या मेळाव्यात बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटीलांचा दरिंदि म्हणून उल्लेख केला आहे.

Published by : Riddhi Vanne

OBC Maha Elgar Sabha Chhagan Bhujbal : राज्य सरकारने हैद्राबाद गॅझेट लागू करण्याच निर्णय घेतल्यानंतर राज्यात मराठा आणि ओबीसी (OBC Reservation) संघर्ष होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता मराठा आरक्षणाच्या जीआरविरोधात ओबीसी समाजाने बीडमध्ये एल्गार पुकारलायं. आज बीडमध्ये महा एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे, या मेळाव्यात बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटीलांचा दरिंदि म्हणून उल्लेख केला आहे.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, "एका मोठ्या विरोध पक्षातील नेत्याने मला फोन करुन सांगितलं जरांगेला दरिंदि जरांगेला भेटायला गेलो होतो तर, तुम्ही आमच्यावर टीका करता. तुमचे हे विखे-पाटील कारण नसताना परत परत जातात आहे, तेव्हा तुम्ही का गप्प बसतात. आम्ही त्यांना सुद्धा सोडणार नाही. त्या बीजेपीच्या नेत्यांना सुद्धा सांगतोय तुमच्या लोकांना आवरा तुम्ही आम्हाला आत केलात ना, आम्ही कोर्टात लढू , तुम्ही उलटे-सुलटे आदेश दिले आहेत ना आम्ही रस्त्यावर, निवडणुकीत लढू. आत्तापर्यंत तुमच्या पाट्या उचललेत आहेत. एक दिवस असा येईल की आमचा हा गोरगरीब ओबीसी, भटका समाज पालखीत बसेल आणि तुम्हाला सतरंजा उठवायला लावल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्ही ओढून आणललं संकट आहे. मराठा समाजातील नेत्यांना मी जेव्हा सांगतो अरे बोला यांच्यावर तेव्हा सगळे मुख गळून बसलेले आहेत. त्याचा अभ्यास नाही, आरक्षण कशासाठी खातात हे त्यांना माहिती नाही, तो सांगतो आणि तुम्ही टाळ्या वाजवता."

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा