महाराष्ट्रातील तमाम नागरिकांचे धन्यवाद आणि त्यांना नमन. एका वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला आशीर्वाद दिला. मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारले.हे वर्ष महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित करत मी महाराष्ट्राच्या जनतेला आश्वस्थ करतो, असाच महाराष्ट्र पुढे जात राहील. पुढे जात राहील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या वर्षपूर्तीबद्दल बोलताना म्हटले आहे. आपण स्वप्न पाहिले की 2015-16 च्या दुष्काळात आपण जो दुष्काळ पाहिला तो दुष्काळ येणाऱ्या पिढीने पाहू नये. त्यामुळे पुढील काळात मराठवाडा दुष्काळमुक्त झालेला दिसेल. सध्याच्या धोरणाचा पुढील चार वर्षात मोठा परिणाम शेती क्षेत्रात पाहायला मिळेल असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
यंदाच्या अतिवृष्टी आणि पुराने शेतकरी अडचणी आला, अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे. 32 हजार कोटींचे पॅकेज जाहीर झाले.शेतकऱ्यांच्या खात्यात मोठ्या प्रमाणात पैसे पोहचवण्याचे काम केले.शेतकऱ्यांचा फायदा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही असेच कार्य करत राहू असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
सात लाख पंप एकट्या महाराष्ट्रात लागले
मी 2014 ला राज्याचा मुख्यमंत्री झालो. दोन वर्षे प्रखर दुष्काळाचा सामना करावा लागला.एकीकडे पाण्याची आणि एकीकडे विजेची अडचण दिसली. कधी दिवसा तर कधी रात्री शेतकऱ्यांना वीज नसल्याची तक्रार होती. शेतकरी म्हणाले आम्हाला 12 तास वीज द्या.मराठवाड्याची पाणीपातळी वाढली असे समितीला समजले आहे. रात्रीची वीज नसल्याने साप,जनावर यांची अडचण असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणी होत्या.आता वीजेच्या बाबतीत राज्य समृद्ध आहे. महाराष्ट्राची योजना ही इतर राज्यात ही लागू करा असे पत्र काढले आहे. कुसुमअंतर्गत साडे नऊ लाख पंप देशात लागले तर सात लाख पंप एकट्या महाराष्ट्रात लागले आहेत अशीही माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
पुढील वर्षी 10 लाख पंप झाले पाहिजे
शेतकरी आधी बिल भरायचे नाहीत.आता 365 दिवस वीज आणि तीन पिके घेण्याची संधी. इको सिस्टममुळे ही क्षमता निर्माण झाली.पेड पेडिंग संपले असून येणारी डिमांड संपवू शकत नव्हतो. मात्र महाराष्ट्राने दरवर्षी 20 हजार पंप लावणारा आता 45,991 पंप एका महिन्यात बसवून विश्वविक्रम केला आहे. डिमांड केल्यापासून एका महिन्यात पंप लागले. मागेल त्याला सौर पंप देऊन विश्वविक्रम बनवला.आम्हीच आमचा रेकॉर्ड ब्रेक करून दाखवू. आम्ही आता साडे सात लाखापर्यंत गेलो. पुढील वर्षी 10 लाख पंप झाले पाहिजे. महाराष्ट्र असे पहिले राज्य होत आहे जे शेतकऱ्यासाठी वेगळी वीज कंपनी बनवत असून शेतकऱ्यांना सौर वीज दिली जाणार आहे. कुठलेही प्रदूषण न करता अन्न आणि शेती करणारे आपले शेतकरी बनणार आहेत असेही त्यांनी सांगितले.
रात्री झोप का येत नाही ?
आपल्याला रात्री झोप यासाठी येत नाही, कारण मला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. अनेक गोष्टी आपल्याला महाराष्ट्रासाठी करायच्या आहेत असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. श्वेतपत्रिका काँग्रेसचे नेते विजय वड्डेटीवार काढावी असे म्हटले आहे, मनात त्यावर बोलताना त्यांच्या सगळ्याच्या खदखद असते की आपण का एवढं महाराष्ट्रासाठी करू शकलो नाही अशी त्यांची भावना असते. फार काही टीका आज त्यांच्यावर आपण करणार नाही असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
नवा विश्वविक्रम केला
वीज बिल पाच वर्षे घेणार नाही असे आधी शेतकरी म्हणत होते. मग आम्ही म्हणालो मात्र पुढे काय ? त्यामुळे सौर पंप असेल तर 25 वर्षे वीज बिल येणार नाही. यामुळे पर्यावरणाची हानी देखील होणार नाही. वीजेचे भाव दरवर्षी आम्ही कमी करणार आहोत. 3 % ने कमी करत आहोत. हा फक्त विश्व विक्रम नसून संपूर्ण देशासाठी आणि ऊर्जा क्षेत्रासाठी हा नवीन आदर्श निर्माण केला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांना स्वप्नं पडतात
देशाचा पंतप्रधान पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी पाय उतार होतील आणि मराठी माणूस होणार आहे असा दावा केला आहे देवेंद्र फडणवीस यावर बोलताना म्हणाले की बाबांना अशी स्वप्नं पडत असतात. पीएम देशासाठी खूप चांगलं काम करत आहेत आणि 2029 ला देखील मोदीजीच पंतप्रधान असतील असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.