भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेने (CISCE) आज ICSE, ISCचे निकाल जाहीर केले आहे. माहितीनुसार, इयत्ता १०वीच्या निकालात ९९.४७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर १२वीच्या परीक्षेत ९८.१९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
आयसीएसई बोर्डाच्या परीक्षेत मुलींनी यंदा बाजी मारली आहे. मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९९.६५ असून मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९९.३१ आहे. आयएससी बोर्डात सुद्धा मुलीच मुलांच्या पुढे आहेत. ९८.९२ टक्के मुली तर ९७.५३ टक्के मुलं आयएससी बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. दहावीच्या निकालामध्ये पश्चिम विभागाची उत्तीर्णतेची टक्केवारी सर्वाधिक म्हणजेच ९९.९१ आहे तर दक्षिण क्षेत्रातील उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९९.८८ आहे.
तुम्ही इयत्ता १०वी आणि १२वीचे विद्यार्थी त्यांचे निकाल अधिकृत वेबसाइट – cisce.org, results.cisce.org वर पाहू शकतात तर १० मे पर्यंत पुनर्तपासणीसाठी अर्ज करता येणार आहे.