ताज्या बातम्या

Nail Health : नखांमधून ओळखा तुमचे आरोग्य कसे आहे? जाणून घ्या...

आपण नखांकडे फक्त सौंदर्याच्या दृष्टीने पाहतो. नेलपॉलिश, डिझाइन, कापणे एवढंच लक्षात घेतो. पण खरं सांगायचं तर नखे आपल्या शरीरातील आरोग्याचे संकेत देतात.

Published by : Riddhi Vanne

आपण नखांकडे फक्त सौंदर्याच्या दृष्टीने पाहतो. नेलपॉलिश, डिझाइन, कापणे एवढंच लक्षात घेतो. पण खरं सांगायचं तर नखे आपल्या शरीरातील आरोग्याचे संकेत देतात. शरीरात काही गडबड सुरू असेल तर त्याचे पहिले संकेत नखांवर दिसू शकतात. डॉक्टरांच्या मते, हृदय, फुफ्फुसे, यकृत, थायरॉईड, मधुमेह किंवा कधी कधी कर्करोगासारख्या आजारांची सुरुवात नखांमधील बदलांपासून होते. त्यामुळे नखांचा रंग, जाडी किंवा आकार बदलल्यास दुर्लक्ष करू नका.

पिवळी नखे

नखे पिवळी पडत असतील तर बुरशीजन्य संसर्ग असू शकतो. काही वेळा थायरॉईड, मधुमेह किंवा फुफ्फुसांच्या आजाराचाही इशारा असतो.

पांढरे डाग किंवा पांढरी नखे

नखांवर छोटे पांढरे डाग दिसणे सामान्य असले तरी ते वारंवार दिसत असतील तर शरीरात पोषणतत्त्वांची कमतरता किंवा औषधांचा दुष्परिणाम असू शकतो.

निळसर किंवा जांभळी नखे

नखे निळी दिसत असतील तर शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही याचा संकेत असू शकतो. हृदय किंवा फुफ्फुसांच्या तक्रारीकडे लक्ष द्या.

नखांवरील गडद लाल अर्धचंद्र

नखांच्या मुळाशी असलेला अर्धचंद्र लालसर दिसत असल्यास तो हृदयविकार, संधिवात किंवा ल्युपससारख्या आजाराशी संबंधित असू शकतो.

नखांच्या भोवती सूज आणि वेदना

नखांच्या आजूबाजूची त्वचा सुजलेली व दुखरी असल्यास संसर्ग किंवा एलर्जी कारणीभूत असू शकते. वेळेवर उपचार गरजेचे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा