राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते छगन भुजबळ यांना राज्यमंत्रिमंडळात स्थान न दिल्याने ओबीसी नेत्यांमध्ये नाराजी आहे. रविवारी ओबीसी नेत्यांनी बैठक घेतली होती. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी सरकारला थेट इशारा दिला होता. त्यानंतर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चॅलेंज दिलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चॅलेंज दिलं आहे. अजित पवार ओबीसीविरोधी भूमिका घेत असतील, तर आम्हाला विचार करावा लागेल असं हाके यांनी म्हटलं आहे. भुजबळ हे ओबीसींचा आवाज आहेत, त्यांना मंत्रिमंडळातून डावलून महायुतीनं काय संदेश दिलाय असा सवाल हाके यांनी केला आहे. जरांगेंनी कायदेशीर मार्गाने त्यांनी आंदोलन करावं, ओबीसींमधून त्यांनी आरक्षण मागू नये, असा इशाराही हाके यांनी दिला आहे.