CSK vs RR 
ताज्या बातम्या

IPL 2024 : हैदराबादच्या पराभवानं 'या' संघांना होणार फायदा, CSK आणि RR चं नवीन कनेक्शन आलं समोर, जाणून घ्या पूर्ण समीकरण

आयपीएल २०२४ मध्ये आज सनरायजर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगणार आहे. गुजरात टायटन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर झाली आहे.

Published by : Naresh Shende

IPL 2024 Play Offs : आयपीएल २०२४ मध्ये आज सनरायजर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगणार आहे. गुजरात टायटन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर झाली आहे. गुजरातसाठी हा सामना महत्त्वाचा नाही. परंतु, सनरायजर्स हैदराबादला प्ले ऑफमध्ये जागा पक्की करण्यासाठी हा सामना जिंकावा लागणार आहे. तर चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्या नजरा या सामन्याला लागल्या आहेत. सनरायजर्स हैदराबादचा या सामन्यात पराभव झाल्यास चेन्नई आणि राजस्थानला याचा फायदा होणार आहे.

आयपीएल गुणतालिकेची स्थिती

कोलकाता नाईट रायडर्सचा संघ १३ सामन्यांमध्ये १९ गुण मिळवून गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. तर राजस्थान रॉयल्सचे १३ सामन्यांमध्ये १६ गुण आहेत, त्यामुळे राजस्थानचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबादचेही १४-१४ गुण आहेत. तर आरसीबीचे १२ आणि लखनऊ सुपर जायंट्सचेही १२ गुण आहेत.

हैदराबादच्या विजयामुळं राजस्थानचं नंबर २ धोक्यात

एसआरएचने आजच्या सामन्यात विजय मिळवल्यास त्यांचे १६ गुण होतील आणि प्ले ऑफसाठी क्वालिफाय होईल. हैदराबादचे दोन सामने बाकी आहेत. जर हैदराबादने दोन सामन्यांत विजय मिळवला, तर त्यांचे संघाचे १८ गुण होतील. राजस्थान रॉयल्सला मागे टाकून त्यांचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहचेल.

चेन्नई सुपर किंग्जचाही नंबर २ वर डोळा

हैदराबादचा या सामन्यात पराभव झाल्यास सीएसकेला फायदा होणार आहे. चेन्नईचे १४ गुण असून एक सामना खेळायचा बाकी आहे. सीएसकेनं जर तो शेवटचा सामना मोठ्या फरकानं जिंकला, तर त्यांचे १६ गुण होतील आणि चांगल्या रनरेटमुळं ते नंबर २ वर पोहचू शकतात. यासाठी हैदराबादचा त्यांच्या दोन्ही सामन्यांत आणि राजस्थानला त्यांच्या शेवटच्या सामन्यात पराभव पत्कारावा लागेल.

RCB आणि CSK चा सामना महत्त्वाचा

जर सनरायजर्स हैदराबाद त्यांच्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभूत झाला, तर आरसीबी आणि सीएसकेचा सामना खूप महत्वाचा ठरेल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai BMC : मॅनहोलभोवती पहारा देणारा 'BMC' चा सुपरमॅन; मुंबईकरांच्या काळजीपोटी भरपावसात पहारा

Latest Marathi News Update live : राज्यपाल आचार्य देवव्रत छत्रपती शिवाजी पार्कमध्ये

Acharya Devvrat : संस्कृतमधून शपथ घेतली, आता आचार्य देवव्रत यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी

Asia Cup 2025 IND vs PAK : टीम इंडियावर मॅच रेफरी घेणार अ‍ॅक्शन? पाकिस्तान खेळाडूंशी हस्तांदोलन न करण खेळाडूंवर भोवणार, काय सांगतो ICC-ACC नियम