T20 World Cup 
ताज्या बातम्या

T20 World Cup 2024 : सेमीफायनल सामन्यासाठी मोठी घोषणा, भारताने टॉप-४ मध्ये प्रवेश केल्यास 'या' ठिकाणी रंगणार सामना

टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जाणून घ्या सेमीफायनलच्या सामन्याबाबत सविस्तर माहिती.

Published by : Naresh Shende

Team India Semi Final Venue : टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केल्यास २७ जूनला गयाना येथे हा सामना खेळवला जाणार आहे. हा टूर्नामेंटचा दुसरा सेमीफायनल सामना असणार आहे. तसच भारतीय चाहत्यांची मागणी लक्षात घेत सामन्याच्या वेळेबाबतही पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. दुसऱ्या सेमीफायनलचा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८.३० वाजता खेळवला जाणार आहे. जर टीम इंडियाने क्वालिफाय केलं, तर भारतीय चाहत्यांना अडचणीचा सामना करावा लागणार नाही. ते योग्य वेळेवर सामना पाहू शकतील.

दुसरा सेमीफायनलचा सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी १०.३० वाजता सुरु होईल. त्यावेळी भारतात रात्रीचे ८ वाजले असतील. जर भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये क्वालिफाय केलं, तर ते दुसरा सेमीफायनलच खेळतील. याशिवाय टीम इंडिया एकच वॉर्मअप सामना खेळणार आहे.

दुसऱ्या सेमीफायनल सामन्यासाठी राखीव दिवस नाही

टी-२० वर्ल्डकपचा पहिला सेमीफायनलचा सामना त्रिनिदादमध्ये २६ जूनला खेळवला जाणार आहे. परंतु, पहिल्या सेमीफायनलसाठी १९० मिनिटे अतिरिक्त वेळ आणि एक राखीव दिवसही ठेवला आहे. पण दुसऱ्या सेमीफायनलसाठी राखीव दिवस नाही.

क्रिकबजने त्यांच्या रिपोर्टमध्ये आयसीसीचा हवाला देत सविस्तर माहिती दिलीय. याशिवाय २६ जूनला त्रिनिदादमध्ये रात्री ८.३० वाजता (भारतात २७ जूनला सकाळी ६ वाजता) होणाऱ्या पहिल्या सेमीफायनलसाठी राखीव दिवस ठेवला आहे. तर २७ जूनला गुयानामध्ये सकाळी १०.३० वाजता (भारतात रात्री ८ वाजता) होणाऱ्या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला नाही. तर दुसऱ्या सेमीफायनलला पावसाच्या परिस्थितीत पूर्ण करण्यासाठी ४ तास १० मिनिट म्हणजेच जवळपास २५० मिनिट एक्स्ट्रा दिले आहेत.

शेड्युलनुसार २६ आणि २७ जूनला दोन्ही सेमीफायनल अनुक्रमे खेळवले जातील. त्यानंतर २९ जूनला फायनलचा सामना रंगणार आहे. जर दुसरा सेमीफायनलचा सामना राखीव दिवस म्हणजेच २८ जूनला खेळवला गेला, तर दुसऱ्या दिवशी फायनलचा सामना आहे. अशातच दुसऱ्या फायनलिस्टला सतत दोन दिवस नॉकआऊट सामने खेळावे लागू शकतात. म्हणून दुसऱ्या सेमीफायनलला राखीव दिवस दिला गेला नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विधानभवन परिसरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक

Car Accident CCTV Footage : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं 4-5 जणांना उडवलं

Ramdas Kadam On Thackeray Bandhu: राजकीय भूकंपाची शक्यता?; राज-उद्धव एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांचे खळबळजनक आरोप

Donald Trump : ट्रम्प यांचा मोठा विजय! ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ अमेरिकन सिनेटमध्ये मंजूर