Leg Cramps Leg Cramps
ताज्या बातम्या

Health Alert : वारंवार पायात गोळे येत असतील तर दुर्लक्ष नको; शरीर देत आहे 'या' आजाराचा इशारा

रात्री कोणतेही जास्त श्रम न करता जर पायात किंवा हातात तीव्र वेदनेसह गोळे येत असतील, तर ही बाब गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. कारण हे केवळ साधे दुखणे नसून शरीरातील काही गंभीर कमतरता किंवा आजारांचे संकेत असू शकतात.

Published by : Riddhi Vanne

Leg Cramps : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत हात-पायात अचानक गोळे येणे (मसल्स क्रॅम्प) ही समस्या अनेकांना भेडसावत आहे. बहुतांश लोक हा त्रास थकवा, कामाचा ताण किंवा हालचालींच्या अभावाशी जोडून दुर्लक्ष करतात. मात्र, वारंवार आणि विशेषतः रात्री कोणतेही जास्त श्रम न करता जर पायात किंवा हातात तीव्र वेदनेसह गोळे येत असतील, तर ही बाब गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. कारण हे केवळ साधे दुखणे नसून शरीरातील काही गंभीर कमतरता किंवा आजारांचे संकेत असू शकतात.

बदलती जीवनशैली ठरते कारण : तासनतास एकाच ठिकाणी बसून काम करणे, व्यायामाचा अभाव, अपुरा व असंतुलित आहार, पाणी कमी पिणे आणि शरीराला जास्त आराम देणे,या सगळ्यांचा थेट परिणाम स्नायूंवर होतो. परिणामी स्नायू कमकुवत होऊन त्यामध्ये आकुंचन येते आणि गोळे येण्याचे प्रमाण वाढते.

पोषक तत्त्वांची कमतरता धोक्याची

तज्ज्ञांच्या मते, वारंवार मसल्स क्रॅम्प येण्यामागे शरीरातील आवश्यक मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सची कमतरता हे प्रमुख कारण असू शकते.

कॅल्शियमची कमतरता :

कॅल्शियम हे केवळ हाडे आणि दातांसाठीच नाही, तर स्नायू व नसांच्या योग्य कार्यासाठीही अत्यंत महत्त्वाचे आहे. दूध, दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या आणि सूर्यप्रकाशाचा अभाव असल्यास कॅल्शियमची पातळी कमी होते. यामुळे स्नायूंमध्ये गोळे येणे, हाडांमध्ये वेदना, थकवा आणि कमजोरी जाणवू शकते.

इलेक्ट्रोलाइट असंतुलन :

सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हे इलेक्ट्रोलाइट्स शरीरातील स्नायूंच्या हालचाली नियंत्रित करतात. जास्त घाम येणे, उलटी-जुलाब, पाणी कमी पिणे किंवा अति चहा-कॉफीचे सेवन केल्यास हे संतुलन बिघडते. विशेषतः पोटॅशियम आणि मॅग्नेशियमची कमतरता असल्यास हात-पायात वारंवार क्रॅम्प येतात.

व्हिटॅमिन D आणि B12 ची कमतरता :

व्हिटॅमिन D कॅल्शियम शोषणासाठी आवश्यक असून त्याची कमतरता हाडे कमकुवत करते. त्यामुळे स्नायू दुखणे आणि गोळे येण्याच्या तक्रारी वाढतात. तर व्हिटॅमिन B12 नसांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. त्याच्या अभावामुळे झिणझिण्या, सुन्नपणा आणि मसल्स क्रॅम्पसारखी लक्षणे दिसून येतात.

नसा आणि रक्ताभिसरणाशी संबंधित धोका

काही वेळा पायापर्यंत रक्तपुरवठा करणाऱ्या नसांमध्ये अडथळे निर्माण झाल्यास चालताना किंवा व्यायाम करताना स्नायूंमध्ये वेदना आणि गोळे येतात. मधुमेहामुळे होणाऱ्या नर्व्ह समस्या, मणक्यांवरील ताण किंवा मज्जासंस्थेचे आजारही यासाठी कारणीभूत ठरू शकतात.

क्रॅम्पपासून कसा मिळवावा आराम?

जर गोळ्यांसोबत सतत थकवा, हाडांमध्ये दुखणे, हात-पायात मुंग्या, झिणझिण्या किंवा नखे कमकुवत होणे अशी लक्षणे दिसत असतील, तर ती दुर्लक्षित करू नयेत. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे.

तात्पुरत्या आरामासाठी क्रॅम्प आलेल्या भागाला हलके स्ट्रेचिंग करावे, मसाज करावा किंवा गरम पाण्याचा शेक घ्यावा. आहारात कॅल्शियम, व्हिटॅमिन D, प्रोटीन आणि इलेक्ट्रोलाइट्सयुक्त पदार्थांचा समावेश करावा. तसेच दिवसभर पुरेसे पाणी पिणे आणि नियमित व्यायाम करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

वारंवार येणारे मसल्स क्रॅम्प हे शरीर देत असलेले इशारे समजून वेळीच योग्य पावले उचलली, तर पुढील गंभीर आजार टाळता येऊ शकतात.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा