ताज्या बातम्या

Railway Rules : कोकणकरांनो गणपतीसाठी रेल्वे तिकीट आरक्षण करताय? ही नियमावली नक्की वाचा, होईल मोठी मदत

गणपती जवळ आले कि तिकीट बुकिंगच्या वेबसाईट वर लोकांची अक्षरशः झुंबड उडालेली पाहायला मिळते. अशावेळी रेल्वेच्या तिकीट बुकिंगच्या नियमावलीबद्दल माहिती असणे गरजेचे असते.

Published by : Team Lokshahi

सध्या कोकणवासीयांना गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. दरवर्षी लाखो चाकरमानी मुंबईमधून कोकणात आपला गणपती उत्सव साजरा करण्यासाठी जातात. गणपती जवळ आले कि तिकीट बुकिंगच्या वेबसाईट वर लोकांची अक्षरशः झुंबड उडालेली पाहायला मिळते. तिकीट बुकिंगच्यावेळी काही गोष्टींची माहिती असली तर आपल्याला आपल्या नियोजित वेळी योग्य तिकीटासह प्रवास करणे शक्य होते. मात्र बऱ्याचवेळा ट्रेनचे आरक्षण फुल्ल होते, किंवा आपले तिकीट वेटिंग लिस्टमध्ये असते. अशा परिस्थितीत आपल्याला रेल्वेच्या तिकीट बुकिंगच्या नियमावलीबद्दल माहिती असेल तर आपल्याला येणाऱ्या त्रुटी आपण टाळू शकतो.

  • तिकीट बुकिंगच्या वेबसाइटवर आपल्या नियोजित प्रवासावेळेच्या 120 दिवस आधी म्हणजेच 4 महिने आधी तिकीट आरक्षणाची व्यवस्था आहे. त्यानुसार आपण आपली ट्रिप ची आखणी करू शकतो.

  • IRCTC च्या नियमानुसार आपल्या रेल्वेच्या अकाऊंटवरून केवळ 6 जणांचीच तिकीट बुक होऊ शकते.

  • ट्रेन सुटण्याच्या 4 तास आधी तुम्ही तुमची तिकीट कॅन्सल करू शकता. या परिस्थितीमध्ये आपण मेल करून रिफंड मिळवू शकतो.

  • रेल्वेच्या तिकिटांचा चार्ट तयार झाल्यावरही तुम्ही तुमचे तिकीट कॅन्सल करू शकता. यावेळी etickets@irctc.co.in या ई-मेलवर सर्व माहिती पाठवल्यास तुम्हाला तुमचे रिफंड मिळू शकते. यासाठी तुम्हाला TDR (Ticket Deposit Receipt) भरावे लागते.

  • तुमचे तिकीट वेटिंग मध्ये असेल आणि चार्ट तयार झाल्यावरही तिकीट कन्फर्म झाले नाही तर या तिकिटावरून तुम्हाला प्रवास करता येणार नाही. त्यावेळी तुमचा तिकीट रिफंड तुमच्या खात्यामध्ये जमा होतो.

  • या महत्वाच्या बाबी लक्षात ठेवल्यास आणि आधीच पूर्वनियोजन केल्यास योग्य आरक्षित तिकीटासह आपला प्रवास आरामदायी आणि सुखकर होऊ शकतो.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल