Animal Care During The Rainy Season : पावसाळ्यात आपल्या घरातील पाळीव प्राणी हे घरातील एका सदस्यासारखेच असतात. त्यामुळे त्यांची काळजीही तशीच घरातील एखाद्या सदस्याप्रमाणेच घेतली गेली पाहिजे. पाळीव प्राण्याची काळजी ही एखाद्या व्यक्तीप्रमाणेच घ्यावी लागते. विशेषतः पावसाळ्यात तर या प्राण्यांची विशेष काळजी घेतली गेली पाहिजे अन्यथा पावसाळ्यात आद्रतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे प्राण्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊन ते आजारी पडू शकतात. पावसाळ्यात ओलावा आणि आर्द्रता वाढल्यामुळे जंतू आणि बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे, पाळीव प्राण्यांना कोरडे ठेवणे, त्यांची नियमित स्वच्छता करणे, योग्य आहार देणे आणि आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे.
पावसाळ्यात पाळीव प्राण्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. काही गोष्टी योग्य रीतीने पाळल्या गेल्या तर घरातील प्राण्यांना एक चांगले निरोगी आरोग्य देऊ शकतो:-
1)पावसाळ्यात आपल्या पाळीव प्राण्यांना शक्यतो कोरडे ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यांना भिजल्यावर लगेच कोरडे करा.
2)त्यांच्या पंजे, कान आणि अंडरआर्म्स या भागांची नियमित स्वच्छता करा, कारण या ठिकाणी ओलावा लवकर टिकून राहतो आणि संसर्गाचा धोका वाढु शकतो यासाठी योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे.
3)पावसाळ्यात पाळीव प्राण्यांना संतुलित आणि सकस आहार द्या. त्यांना जास्त पाणी पिण्यास प्रवृत्त करा.तसेच त्यांना रस्त्यावरील काहीही खाण्यास मनाई करा.
4)पावसाळ्यात तुमच्या पाळीव प्राण्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवा. त्यांना काही संसर्ग किंवा आजारपणाची लक्षणे दिसल्यास त्वरित पशुवैद्याकडे घेऊन जा.आणि वेळोवेळी त्यांचे टीकाकारण करा.
5)पावसाळ्यात पाळीव प्राण्यांसाठी सुरक्षित आणि कोरडी जागा उपलब्ध करून द्या.त्याची जागा नेहमी साफ आणि स्वच्छ ठेवा.
6)पावसाळ्यात आपल्या पाळीव प्राण्यांना फिरण्यासाठी कमी पावसाच्या वेळेची निवड करा.
7)पावसाळ्यात डास आणि पिसूंचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे तुमच्या पशुवैद्याच्या सल्ल्यानुसार कीटकनाशके वापरा.
8)पावसाळ्यात पाळीव प्राण्यांसाठी स्वच्छ पाण्याचे भांडे ठेवा आणि ते नियमितपणे स्वच्छ करा.
अश्याप्रकारे आपल्या घरातील प्राण्यांची योग्य निगा राखली गेली तर त्यांना कोणत्याही संसर्गाचा प्रादुर्भाव होणार नाही. त्याचबरोबर आपल्या घरातील पाळीव प्राणी हे हेल्दी आणि निरोगी राहतील.