Pakistan IMF Loan Pakistan IMF Loan
ताज्या बातम्या

Pakistan IMF Loan : IMF कर्जासाठी पाकिस्तान पुन्हा हतबल; राष्ट्रीय संपत्ती विक्रीची वेळ, या' कठोर अटींनी अडकले हातपाय

पाकिस्तान पुन्हा एकदा प्रचंड आर्थिक संकटात सापडला असून, गळ्यापर्यंत कर्जबाजारी झालेलं हे देश IMF कडे आणखी कर्जासाठी मदतीची याचना करताना दिसत आहे.

Published by : Riddhi Vanne

(Pakistan IMF Loan) : पाकिस्तान पुन्हा एकदा प्रचंड आर्थिक संकटात सापडला असून, गळ्यापर्यंत कर्जबाजारी झालेलं हे देश IMF कडे आणखी कर्जासाठी मदतीची याचना करताना दिसत आहे. मात्र, यावेळी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने कर्ज देण्यासाठी अशा कठीण अटी ठेवल्या आहेत की पाकिस्तानसमोर महत्वाची राष्ट्रीय संपत्ती विकण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

कंगाल पाकिस्तानसाठी IMF ने पुन्हा एकदा मदतीचे दरवाजे उघडले आहेत. अर्थव्यवस्था ढासळलेली, विदेशी चलनसाठा जवळजवळ संपलेला आणि महागाई ‘दर’ आटोक्याबाहेर गेलेली अशा परिस्थितीत IMF बोर्डाने सोमवारी नवी कर्ज समीक्षा मंजूर केली. या मंजुरीनंतर पाकिस्तानला जवळपास 1.2 अब्ज डॉलरचा निधी मिळणार आहे. या रकमेने पाकिस्तानला चलनसाठा वाढवण्यास आणि महागाईवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. हा निधी मिळाल्यानंतर सधनता नसलेल्या पाकिस्तानला थोडाफार श्वास मिळेल अशी अपेक्षा आहे.

कर्जाच्या बदल्यात टाकल्या कठोर अटी

IMF ने पाकिस्तानला मदत करताना काही तगड्या अटी ठेवल्या आहेत. त्यापैकी प्रमुख म्हणजे

  • कर संकलन मोठ्या प्रमाणात वाढवणे

  • सरकारी संस्थांचे खासगीकरण गतिमान करणे

  • अनावश्यक खर्च कमी करणे

  • आर्थिक सुधारणा जलद गतीने लागू करणे

IMF चं स्पष्ट मत आहे की पाकिस्तानने आर्थिक धोरणांमध्ये तर्कशुद्ध बदल करणं गरजेचं आहे. खासगी क्षेत्राला चालना मिळाली तरच अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असा त्यांचा विश्वास आहे.

IMF चा निधी कोणत्या स्वरूपात?

IMF बोर्डाने पाकिस्तानला 7 अब्ज डॉलरच्या 'एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी' अंतर्गत 1 अब्ज डॉलर आणि 20 कोटी डॉलर 'रेजिलिएंस अ‍ॅंड सस्टेनेबिलिटी फॅसिलिटी' अंतर्गत देण्यास मान्यता दिली. या दोन्ही योजनांमधून पाकिस्तानला आतापर्यंत जवळपास 3.3 अब्ज डॉलर मिळाले आहेत.

IMF चं म्हणणं आहे की:

“पाकिस्तान आर्थिक स्थिरतेकडे वाटचाल करत आहे. महागाई थोडी घटली आहे, विदेशी चलनसाठा वाढतो आहे आणि गुंतवणूकदारांचा विश्वासही परत येत आहे.”

राष्ट्रीय संस्थेचा लिलाव—PIA विक्रीची वेळ

IMF च्या अटींनुसार पाकिस्तानने खासगीकरणाचा वेग वाढवणे आवश्यक आहे. याचाच भाग म्हणून 20 वर्षांतील सर्वात मोठी खासगीकरण मोहीम सुरू झाली आहे.

या अंतर्गत पाकिस्तानने आपली राष्ट्रीय विमानसेवा PIA (Pakistan International Airlines) विकण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी जाहीर केलं की PIA मधील हिस्सेदारीसाठी 23 डिसेंबर रोजी बोली प्रक्रिया** होणार आहे. चार प्रमुख उद्योगसमूहांना बोली लावण्याची परवानगी दिली गेली आहे.

PIA विकत घेण्यासाठी पुढील कंपन्या उत्सुक आहेत—

  • फौजी फर्टिलायझर कंपनी

  • लकी सिमेंट समूह

  • आरिफ हबीब कॉर्प

  • एअर ब्लू लिमिटेड

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा