Vasai : वसईत परप्रांतीयचा माज; शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास मनाई, नेमकं काय झाल?  Vasai : वसईत परप्रांतीयचा माज; शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास मनाई, नेमकं काय झाल?
ताज्या बातम्या

Vasai : वसईत परप्रांतीयचा माज; शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास मनाई, Video Viral

वसईमधील किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात शूट करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला एका परप्रांतीय सुरक्षा रक्षकाने रोखल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

Published by : Riddhi Vanne

राज्यात मराठी भाषेवरुन राज ठाकरेंचे मनसैनिक तापलेले पाहायला मिळाले. त्यानंतर उद्धव ठाकरेंकडून देखील मराठी भाषेसाठी आक्रमक झालेले पाहायला मिळाले. याचपार्श्वभूमिवर 5 जुलैला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा विजयी मेळावा वरळी डोम येथे झाला. यानंतर मात्र मराठी भाषिकांचा मुद्दा चांगलाच गाजला. मनसेने अनेक ठिकाणी मराठी भाषेसाठी आंदोलन करत केली. आज वसईमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसईमधील एका किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात शूट करण्यासाठी आलेल्या तरुणाला एका परप्रांतीय सुरक्षा रक्षकाने रोखले.

वसईमधील किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात शूट करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला एका परप्रांतीय सुरक्षा रक्षकाने रोखल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यामध्ये एक तरुण छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या वेशात फोटोशूट करत होता. त्यावेळी त्या सुरक्षा रक्षकाने त्या तरुणाला फोटोशूट करण्यास मनाई केली. त्यामुळे तरुणाने स्पष्ट विचारले की, तुम्हाला मराठी येते का? त्यावेळेस त्या सुरक्षा रक्षकाने सरळ नाही म्हणाला...

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा