ताज्या बातम्या

Shri Amarnath Yatra : श्री अमरनाथ यात्रेचं पावित्र्य आणि महत्त्व; जाणून घ्या वैशिष्ट्य

अमरनाथ भारतातील जम्मू आणि काश्मीर राज्यातील पवित्र तीर्थस्थळ असून येथे नैसर्गिक गुहा आहे.

Published by : Rashmi Mane

अमरनाथ भारतातील जम्मू आणि काश्मीर राज्यातील पवित्र तीर्थस्थळ असून येथे नैसर्गिक गुहा आहे. ही गुहा जम्मू-काश्मीर राज्यामध्ये असून श्रीनगर पासून साधारणपणे 135 किमीवर समुद्रसपाटीपासून 13,600 फूट उंचीवर आहे. येथील गुहेमध्ये बर्फाचे शिवलिंग तयार होते. ते पहायला दरवर्षी उन्हाळ्यात हजारो-लाखो भाविक येथे भेट देतात. हे शिवलिंग साधारणपणे 8 ते 10 फूट उंचीचे असते. परंतु लिंगाचा आकार हवामानाप्रमाणे कमी जास्त होत असतो. असेही मानले जाते की, शिवलिंगाचा आकार चंद्राच्या कलेप्रमाणे कमी जास्त होत असतो. गुहेमध्ये अजून काही लहान हिमखंड आहेत. त्यांना गणेश-पार्वतीचे रूप समजले जाते. मुख्य लिंगाच्या वर नैसर्गिक पाण्याची घळ आहे. त्या घळीमधून पाणी टपकत असते. त्यामुळे हे शिवलिंग तयार होते.

स्वयंभू हिमानी शिवलिंग

पवित्र गुहेत बर्फामुळे नैसर्गिक शिवलिंग तयार होणे हे या ठिकाणचे मुख्य वैशिष्ट्य आहे. नैसर्गिक बर्फापासून निर्माण झाल्यामुळे त्याला स्वयंभू हिमानी शिवलिंग असेही म्हणतात.

लाखो भाविक पवित्र हिमालिंग दर्शनासाठी येतात

संपूर्ण श्रावण महिन्यात आषाढ पौर्णिमेपासून रक्षाबंधन पवित्र हिमालिंग दर्शनासाठी लाखो लोक येथे येतात. त्या गुहेचा परिघ सुमारे दीडशे फूट आहे आणि त्यातून वरून बर्फाच्या पाण्याचे थेंब पडतात. येथे एक ठिकाण आहे, ज्यामध्ये बर्फाच्या थेंबापासून दहा फूट लांब शिवलिंग तयार होते. चंद्राच्या वाढ आणि घटनेमुळे या बर्फाचे आकारही कमी होत आहे.

अमरनाथ यात्रा 45 दिवस चालते 

साधारण 45 दिवस हिंदू तीथींप्रमाणे जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून ते ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत अमरनाथ यात्रा काढली जाते.

फक्त 13 किमीचा रस्ता

गुहेकडे जाण्यासाठी मुख्यत्वे दोन रस्ते आहेत. पहिला मार्ग सोनमर्ग - बालताल- अमरनाथच्या बाजूने आहे. हा रस्ता फक्त 13 किमीचा असून बहुंताशी भाविक याच मार्गाने येणे पसंत करतात.

हिमालयाचे विलोभनीय दर्शन

दुसरा मार्ग पहेलगाम - चंदनवाडी- पिस्सुटॉप- शेषनाग-पंचतरणी- अमरनाथ असा आहे. हा मार्ग 45-50 किमीचा असून जास्त खडतर आहे. परंतु हिमालयाचे विलोभनीय दर्शन या मार्गात होते. म्हणून अनेक जण हा मार्ग निवडतात.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा