Shravan 2025 : श्रावण महिन्याचे महत्व आणि कधीपासून सुरु होतोय जाणून घ्या..  Shravan 2025 : श्रावण महिन्याचे महत्व आणि कधीपासून सुरु होतोय जाणून घ्या..
ताज्या बातम्या

Shravan 2025 : श्रावण महिन्याचे महत्व आणि कधीपासून सुरु होतोय जाणून घ्या..

श्रावण 2025: श्रावण महिन्याचे महत्व आणि उपवासाची परंपरा महाराष्ट्रात कधीपासून सुरु होणार आहे.

Published by : Riddhi Vanne

Importance Of the Month of Shravan and When Does It Start? : श्रावण मासी हर्ष मानसी.... असे कवितेमध्ये केलेले श्रावणाचे वर्णन खरचं लोभसवाणे असते. दिवसांत मस्त पाऊस पडतो आणि चहुबाजूनी धरती हिरवळीने नटलेली असते. अशा सुंदर आणि आल्हाददायक वातावरणाचा श्रावण सर्वांनाच हवाहवासा वाटतो. उत्तर भरातीयांचा श्रावण महिना कालपासून सुरु झाला आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये अजून श्रावण सुरु होण्यास अवकाश आहे. उत्तर भारतातील पंचांग पद्धतीप्रमाणे आषाढातील पौर्णिमेनंतर श्रावण महिना सुरु होतो तर महाराष्ट्रामध्ये आषाढामधील अमावस्येनंतर श्रावण महिना सुरु होतो. महाराष्ट्रामध्ये मराठी पंचांगात श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्व आहे.

श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असून, या महिन्यात उपवास, पूजा आणि धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे, उत्तरेकडील श्रावण महिना लवकर सुरू होतो, तर महाराष्ट्रात तो साधारणपणे 15 दिवसांनी सुरू होतो. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, झारखंडसह उत्तर आणि पूर्व भारतात श्रावण महिना सुरू झाला आहे. महाराष्ट्रात मराठी पंचांगानुसार आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या 24 जुलै 2025 ला आहे. त्यानंतर 25 जुलै 2025 शुक्रवारपासून श्रावण मास सुरु होणार आहे. तर 23 ऑगस्टपर्यंत श्रावण महिना सुरु असणार आहे.

श्रावण महिन्यात अनेक लोक उपवास करतात आणि भगवान शंकराची पूजा करतात. श्रावण महिन्यातील सोमवार "श्रावणी सोमवार" म्हणून ओळखले जातात. या दिवशी शंकराची विशेष पूजा केली जाते. यंदाच्या श्रावणात ४ श्रावणी सोमवारचे व्रत आहेत. या श्रावणातील दर सोमवारी महादेव म्हणजेच शंकराच्या पिंडीवर शिवामूठ म्हणून वेगवेगळे धान्य अर्पण करण्याची परंपरा आहे. याच श्रावण महिन्यात महिलांचा आनंदाचा सण म्हणजेच मंगळागौरी तिथीसुद्धा असते. यंदा पहिला श्रावणी सोमवार 28 जुलैला असून चौथा सोमवार 18 ऑगस्टला आहे. श्रावणी सोमवारी महादेवाला त्या त्या दिवशी ते ते धान्य अर्पण केले जाते.

पहिला सोमवार – 28 जुलै 2025 – शिवामूठ – तांदूळ

दुसरा सोमवार – 4 ऑगस्ट 2025 – शिवामूठ – तीळ

तिसरा सोमवार – 11 ऑगस्ट 2025 शिवामूठ – मूग

चौथा सोमवार – 18 ऑगस्ट 2025 – शिवामूठ – जव

पौराणिक मान्यतेनुसार श्रावणात व्रत केल्यामुळे आपले भविष्य खूप चांगले होते. भगवान शंकराची आपल्यावर कृपादृष्टी राहते असा समज आहे. या श्रावण महिन्यात केवळ सोमवारीच नाही तर काहीजण श्रावणी शनिवारीही उपवास धरतात. श्रावणात विविध सणांची सुद्धा रेलचेल असते.श्रावणातील हरियाली तीज नागपंचमी,रक्षाबंधन, पिठोरी अमावस्या, मंगळागौर अश्या विविध सण या एकट्या श्रावण महिन्यात असतात. श्रावणातील व्रत केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदते असा समज आहे. श्रावण महिन्यात शिवलिंगावर पाणी, दूध, बेलपत्र, धतुरा, मध इत्यादी अर्पण करण्याची परंपरा आहे.विशेषतः सोमवारी उपवास करून भगवान शिवाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात अशा धारणा आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope |'या' राशीच्या लोकांना आजचा दिवस फायदेशील असेल, जाणून घ्या कसा आहे आजचा दिवस ?

Aajcha Suvichar - आजचा सुविचार

Pandurang Balkawade : 'किल्ल्यांचं जतन करण्याची जबाबदारी सर्वांची'; इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांचं प्रतिपादन

Hindi Language : पवन कल्याण यांचे हिंदीवरील वक्तव्य वादात; प्रकाश राज यांनी केली तीव्र टीका