ताज्या बातम्या

Supreme Court : "कोणत्याही कर्मचाऱ्यासाठी पदोन्नती हा हक्क नाही" ; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

कोणत्याही कर्मचाऱ्यासाठी पदोन्नती हा हक्क नसल्याचं सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

Published by : Prachi Nate

प्रत्येक कंपनीमध्ये कर्मचारी ज्यावेळेस आपली शंभर टक्के कामगिरी बजावतात, त्यावेळेस त्यांच्या मनात विचार असतो आपला बॉस आपलं काम पाहून आपली बढती करेल. याच आशेवर प्रत्येक कर्मचारी आपली कामगिरी आणखी उत्तम कशी होईल याचा विचार करतो. मात्र सेवेतील पदोन्नतीबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. कोणत्याही कर्मचाऱ्यासाठी पदोन्नती हा हक्क नसल्याचं तामिळनाडू येथील एका पोलीस कॉन्स्टेबलने दाखल केलेल्या याचिकेवर खंडपीठाने सुनावणी घेतली.

"कोणत्याही कर्मचाऱ्यासाठी पदोन्नती हा हक्क नाही. परंतु, अपात्र ठरवले जाईपर्यंत पदोन्नतीसाठी त्याच्या नावाचा विचार करण्याचा हक्क आहे", असा निर्णय न्यायमूर्ती सुधांशु धुलिया आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने दिला आहे. त्याचसोबत पोलीस कॉन्स्टेबलने त्याचे नाव पदोन्नतीसाठी विचारात घेण्याबाबत निर्देश देण्याची विनंती मद्रास उच्च न्यायालयाला केली होती.

मात्र तेथे त्याची याचिका फेटाळली होती. पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती देण्याचा विचार केला गेला नाही. त्यामुळे निराश झालेल्या पदोन्नतीचा हक्क असल्याचा दावा करीत अपील केले. त्यावर न्यायालयाने पदोन्नती हा कर्मचाऱ्याचा हक्क नसल्याची टिप्पणी केली.

"ही सामान्य गोष्ट आहे की कर्मचाऱ्याला पदोन्नती मिळवण्याचा कोणताही हक्क नाही. परंतु पदोन्नतीसाठी निवड करण्याच्या प्रक्रियेत कर्मचाऱ्याच्या नावाचा विचार करण्याचा हक्क आहे. अपात्र घोषित करेपर्यंत कर्मचारी आपले नाव पदोन्नतीसाठी विचारात घेण्यास सांगू शकतो", असे खंडपीठ म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Independence Day 2025 Wishes : स्वातंत्र्य दिनानिमित्त मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा देशभक्ती, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना आज चांगली बातमी मिळण्याची शक्यता, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Janmashtami Wishes 2025 In Marathi : अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं... श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त WhatsApp, Facebook ला ठेवा सुंदर स्टेटस

आजचा सुविचार