लोकशाही मराठीच्या व्यासपीठवर आज "उत्तर महाराष्ट्र संवाद 2025" या कार्यक्रमाचे आयोजन नाशिक येथे करण्यात आले आहे. लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे आणि दीपक बिल्डर अॅंड डेवलपर्स प्रस्तुत या कार्यक्रमाला आज सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. याचपार्श्वभूमिवर या कार्यक्रमात शंकरानंद सरस्वती - त्र्यंबकेश्वर , भक्तीचरि दास - आखाडा पररषद अध्यक्ष, महंत सुगधरदास - र्नवासिी आखाडा, महामंडलेश्वर लशवानी गगरी यांनी उपस्थिती लावली होती. यादरम्यान या तिन्ही महंतांची मुलाखत घेण्यात आली, यावेळी त्यांनी नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
"नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये कुंभमेळ्यासाठी प्रशासनाच्या आकडेवारीनुसार जवळपास एक कोटी भाविक येण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र, आमचं असं म्हणणं आहे की, जवळपास 3 ते 5 कोटी भाविक या कुंभमेळ्यात सहभागी होतील, त्या अनुषंगाने प्रशासनाने त्या पद्धतीने तयारी सुरू आहे पण या सर्व भाविकांची व्यवस्था प्रशासनाला करावी लागणार आहे. 500 एकर जागा ही प्रशासनाने कायमस्वरूपी केली पाहिजे आम्ही असं म्हणत आहोत मात्र प्रशासन अजून यावर काही विचार करत नाही आहे. नाशिकला पाच कॅबिनेट मंत्री लाभलेत, या पाचही कॅबिनेट मंत्र्यांनी जर ताकद लावली तर हा कुंभमेळा खूप उत्तम होईल आणि चार लाख कोटी रुपये उत्पन्न यातून मिळेल असं मला वाटतं".
"प्रयागराजला जर बघितलं तर 60 ते 70 कोटी भाविकांनी दर्शन घेतला आहे. त्यातले दहा टक्के जरी नाशिक आणि त्रंबकमध्ये गृहीत केले. तरी या येणाऱ्या भाविकांचे व्यवस्थापन संदर्भात प्रशासन आणि शासनासमोर मोठे आव्हान आहे. राज्याचे दोन्ही मुख्यमंत्री हे या अगोदरही कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये आले होते. त्यावेळेस मला मुख्यमंत्री म्हणाले की, मला अल्प कालावधी मिळाला त्यामुळे मी कुंभमेळ्याची व्यवस्थित तयारी करू शकलो नाही. त्यावेळेस मुख्यमंत्री असेही म्हणाले होते की, ज्यावेळेस हा कुंभ समारोप झाला, तर येणाऱ्या 12 वर्षाच्या कुंभाची तयारी आजपासून केली पाहिजे. मात्र मुख्यमंत्री हे फक्त बोलून लोकांना खुश करतात की काय असा आम्हाला वाटतं. या कुंभाचा योग जो आला आहे हा जवळपास 180 वर्षांनंतर आलेला योग आहे".
कुंभमेळ्यादरम्यान प्रशासनाने कोणती काळजी घ्यावी?
"कुंभ सुरू झाल्यानंतर पहिलं शाही स्नान हे अमोशाला होतं मात्र यावेळेसची अमोशाही महत्वपूर्ण आहे सोमवती अमोशाला हे पहिलं स्नान होणार आहे. शासनाने प्रशासनाने या कुंभमेळाला बिलकुल हलकं घेऊ नये. हा कुंभमेळा पूर्णत्वास नेण्यासाठी मेहनत आणि प्रयत्न करावे. ज्या पद्धतीने नुकत्याच झालेल्या कुंभमेळ्याच्या माध्यमातून शासनाला उत्पन्न मिळालं तसंच या कुंभमेळ्यातूनही शासनाला उत्पन्न मिळेल".
"प्रयागराज या ठिकाणी झालेल्या कुंभमेळ्यात प्रशासनाच्या वतीने ज्या पद्धतीने व्यवस्था केली, त्या पद्धतीने नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याची भाविकांची व्यवस्था, पार्किंग व्यवस्था ही प्रशासनाने व्यवस्थित रित्या करावी. सध्या परिस्थितीमध्ये पावसाचा मोठा प्रमाणात आगमन सुरू आहे त्या अनुषंगाने देखील प्रशासनाने शासनाने विचार करावा".
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कुंभ मंत्री गिरीश महाजन यांना माझी विनंती आहे की, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कामाला सुरुवात करावी. कारण, वेळ फार कमी आहे आणि काम खूप आहेत त्या अनुषंगाने कुंभमेळ्याची तयारी वेगात व्हायला पाहिजे तशी अजून दिसत नाही. आयोध्या नगरच्या मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी माननीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या आमची भेट झाली त्यावेळेस मी त्यांना नक्कीच बोललो की ज्या पद्धतीने तुम्ही इतर धर्म स्थळांना मदत करत असतात तसेच नाशिक येथीलही होणाऱ्या कुंभमेळ्याला व धार्मिक स्थळांकडे देखील लक्ष देऊन विकास करावा तर त्यावेळी त्यांनी हो म्हटलं होतं त्यामुळे आशा आहे केंद्र सरकारकडून देखील कुंभमेळ्याला मदत होईल."