ताज्या बातम्या

Devendra Fadanvis : त्रिभाषा धोरणावर आज मुख्यमंत्री निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक; सरकारची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता

त्रिभाषा धोरणाच्या विरोधात मनसेचे आंदोलन; आजच्या बैठकीत सरकारची भूमिका ठरणार

Published by : Shamal Sawant

राज्याच्या शैक्षणिक धोरणातील त्रिभाषा संकल्पनेवरून सध्या राज्यात मोठं राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलेलं असताना, आज रात्री मुख्यमंत्री निवास 'वर्षा' येथे एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक रात्री 9 वाजता पार पडणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि अजित पवार तसेच शिक्षण विभागाचे सचिव उपस्थित राहणार आहेत.

सद्यस्थितीत त्रिभाषा धोरणात हिंदीचा सक्तीने समावेश करण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना, विविध सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक आणि शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. मराठीच्या अस्तित्वावर आणि स्थानिक भाषेच्या अधिकारांवर गदा येईल, असा या घटकांचा आक्षेप आहे. त्यामुळेच आजची बैठक अत्यंत संवेदनशील आणि निर्णायक मानली जात आहे.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत सरकार त्रिभाषा धोरणासंबंधी आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मराठी जनतेच्या भावना आणि संतप्त प्रतिक्रिया लक्षात घेता, या विषयावर ठोस निर्णय अपेक्षित आहे.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज सकाळपासूनच मुंबईसह राज्यभरात विविध ठिकाणी हिंदी सक्तीविरोधात आंदोलन छेडलं आहे. दादर येथील IES शाळेबाहेर आंदोलन करत मनसेने सरकारला थेट सवाल केला आहे – "मराठी शाळांवर हिंदी लादून काय साध्य करायचं आहे?" या पार्श्वभूमीवर, आज रात्री होणारी बैठक राज्याच्या भाषिक धोरणाचा टर्निंग पॉइंट ठरू शकते. सरकार मराठी जनतेच्या भावनांचा कितपत विचार करते आणि त्रिभाषा धोरणात कोणते बदल करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा