थोडक्यात
काँग्रेस पक्षाच्या राज्य निवडणूक मंडळाची महत्वाची बैठक
दादरच्या टिळक भवनात होणार बैठक
सकाळी 10 वाजता बैठकीला होणार सुरुवात
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या राज्य निवडणूक मंडळाची महत्वाची बैठक आज सकाळी 10 वाजता दादरच्या टिळक भवनात होणार आहे. या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आ. विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे नेते आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील, ज्येष्ठ नेते, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, माजी मंत्री आ. अमित देशमुख, आ. विश्वजित कदम यांच्यासह निवड मंडळाचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.