थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी काही दिवस आधी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती, ही योजना महिला वर्गामध्ये चांगलीच लोकप्रिय ठरल्याचं पहायला मिळालं, या योजनेचा मोठा फयदा त्यावेळी विधानसभा निवडणुकीत महायुतीला झाल्याचं दिसून आलं. महायुतीमधील नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी या योजनेतील लाभार्थी महिलांना 2100 रुपये देण्याचं आश्वासन देखील दिलं होतं. मात्र त्याबाबत अजून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही, अजूनही या योजनेंतर्गत महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपयेच जमा करण्यात येत आहेत. दरम्यान असं असतानाही आता या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर मोठा ताण पडत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता सरकारने या योजनेसाठी इ- केवायसी बंधनकारक केली आहे. ज्या महिला केवायसी करणार नाहीत त्याची नावं या योजनेतून वगळण्यात येण्याची शक्यता आहे.
या योजनेसाठी पात्र नसताना देखील अनेक महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आल्यानं आता सरकारकडून केवायसीचा निर्णय घेण्यात आला आहे, दरम्यान केवायसी करण्यासाठी 18 नोव्हेंबर ही डेडलाईन आहे. केवायसीसाठी अवघे तीन दिवस शिल्लक असताना देखील अजूनही तब्बल 1.3 कोटी महिलांनी केवायसी केली नसल्याचं समोर आलं आहे, याबाबत नवभारत टाईम्सनं वृत्त दिलं आहे. या वृत्तानुसार राज्यात या योजनेच्या एकूण लाभार्थी महिलांची संख्या 2.35 कोटी इतकी आहेत, त्यातील 1.3 कोटी महिलांची केवायसी अद्यापही बाकी आहे. त्यामुळे आता सरकार पुन्हा एकदा या योजनेच्या केवायसीची तारीख वाढवण्याच्या तयारी असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत लवकरच मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या योजनेतील लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत, निवडणूक आयोगाकडून नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे, त्यानंतर लगेचच राज्यात महापालिकांच्या निवडणुका देखील होणार आहेत, त्यामुळे या निवडणुकांपर्यंत सरकार या योजनेबाबत कोणताही कडक निर्णय घेणार नसल्याची माहिती देखील समोर आली आहे, त्यामुळे या योजनेसाठी अपात्र असताना देखील ज्या महिला लाभ घेत आहेत, त्यांची नाव देखील या योजनेतून सध्या तरी वगळी जाणार नाहीत अशी चर्चा सुरू आहे.
Summery
लाडक्या बहिणींना लागणार लॉटरी?
सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत,
योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट