थोडक्यात
रेल्वेचं वेळापत्रक कोलमडणार
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी,
रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक
मध्य रेल्वेच्या प्रवाशांनो रविवारी मेगाब्लॉक असल्याने घरातून बाहेर पडताना लोकलचे वेळापत्रक पाहूनच तुम्हाला निर्णय घ्यावा लागणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्ग, हार्बर मार्ग आणि ट्रान्सहार्बर अशा तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉकचे कामे असल्याने प्रवाशांना प्रवास करताना गर्दीचा सामना करावा लागणार आहे. चला तर पाहूयात कोणत्या वेळात हे मेगाब्लॉक आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हीजनच्या उपनगरीय मार्गावर १६ नोव्हेंबर २०२५ रोजी विविध इंजिनिअरिंग आणि देखभालीच्या कामासाठी खालील प्रमाणे मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.
मुख्य मार्गावर –
सीएसएमटी मुंबई आणि विद्याविहार स्थानकाच्या दरम्यान सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक आहे. त्यामुळे सीएमएमटी मुंबई हून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ पर्यंत धावणाऱ्या डाऊन धिम्या लोकल सीएसएमटी मुंबई आणि विद्याविहार दरम्यान डाऊन जलद मार्गाने वळवल्या जातील.त्यामुळे त्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुन्हा विद्याविहार स्थानकानंतर डाऊन धिम्या मार्गावर धावतील. घाटकोपरवरुन सकाळी १०.१९ वाजता दुपारी ३.५२ वाजता सुटणाऱ्या अप धिम्या लोकल ट्रेन विद्याविहार आणि सीएसएमटी मुंबई स्थानकादरम्यान अप फास्ट मार्गाने वळवल्या जातील आणि कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखला स्थानकावर थांबतील.
हार्बर मार्ग ब्लॉक
पनवेल आणि वाशी स्थानकांच्या दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर (पोर्ट लाईन वगळून ) सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजताच्या दरम्यान मेगाब्लॉक असणार आहे.
हार्बर मार्गाच्या लोकलची स्थिती
पनवेल येथून सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ पर्यंत आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ पर्यंत बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल रद्द राहतील.
ट्रान्स-हार्बर मार्ग –
ट्रान्स हार्बर मार्गावरील स्थिती
पनवेलहून सुटणाऱ्या ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत आणि ठाणे येथून सुटणाऱ्या पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० पर्यंत रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी विभागात विशेष लोकल चालवल्या जातील. ब्लॉक काळात ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर लाईन सेवा उपलब्ध असतील. ब्लॉक काळात पोर्ट मार्ग उपलब्ध असणार आहे.