ताज्या बातम्या

UPSC : विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! यूपीएससीचा मोठा निर्णय

यूपीएसीने (UPSC) नागरी सेवा प्राथमिक परीक्षेची (CSE Prelims) प्रोव्हिजनल आन्सर की आता परीक्षेनंतर लगेचच जाहीर केल्या जाणार असल्याचा मोठा निर्णय घेतला आहे,

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

  • पूर्व परीक्षेनंतर लगेच जारी होणार उत्तर पत्रिका

  • आतापर्यंतची प्रक्रिया कशी होती?

  • यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा म्हणजे काय?

यूपीएसीने (UPSC) नागरी सेवा प्राथमिक परीक्षेची (CSE Prelims) प्रोव्हिजनल आन्सर की आता परीक्षेनंतर लगेचच जाहीर केल्या जाणार असल्याचा मोठा निर्णय घेतला आहे, अशी माहिती आयोगाने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे. एका याचिकेला पारदर्शकता वाढविण्याच्या मागणीसाठी उत्तर देताना आयोगाने न्यायालयाला ही माहिती दिली आहे. नागरी सेवा परीक्षेची तयारी करणारे लाखो उमेदवार बऱ्याच काळापासून ही मागणी करत होते. UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या उमेदवारांना प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांवर आक्षेप घेण्याची संधी देखील मिळेल. तथापि, परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतरच अंतिम उत्तरपत्रिका जाहीर केली जाणार आहे.

आतापर्यंतची प्रक्रिया कशी होती?

आतापर्यंत, संपूर्ण परीक्षा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतरच यूपीएससीमध्ये उत्तरपत्रिका, गुण आणि कट-ऑफ प्रकाशित करण्याची पद्धत होती. मात्र, या नवीन निर्णयामुळे, उमेदवारांना परीक्षेनंतर लगेचच त्यांचे उत्तर तपासण्याची संधी मिळणार आहे. न्यायमूर्ती पी.एस. नरसिंह यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या (Suprem Court) खंडपीठासमोर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आयोगाने म्हटले आहे की, परीक्षेत पारदर्शकता वाढविण्यासाठी व्यापक विचारविनिमयानंतर त्यांनी हा निर्णय घेण्यात आला आहे.

विद्यार्थांना तीन अधिकृत स्तोत द्यावे लागणार

यूपीएससीने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, उमेदवारांना चुकीच्या उत्तरांवर आक्षेप घेता येणार आहे. मात्र, आक्षेपांसह किमान तीन अधिकृत स्रोत उमेदवारांना प्रदान करणे बंधनकारक असणार आहे. उमेदवारांनी प्रत्येक आक्षेपासह किमान तीन अधिकृत स्रोत प्रदान करावेत. विषय तज्ज्ञांची एक टीम प्राप्त झालेल्या आक्षेपांचा विचार करेल आणि अंतिम आन्सर की तयार करेल. या अंतिम आन्सर कीच्या आधारे पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल. मात्र, अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतरच पूर्व परीक्षेची अंतिम आन्सर की जाहीर केली जाईल असे आयोगाने स्पष्ट केले आहे. UPSC Decided To Publish Provisional Answer Keys After Prelims

यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा म्हणजे काय?

दरवर्षी लाखो उमेदवार आयएएस, आयपीएस किंवा आयएफएस अधिकारी बनू इच्छिणारे यूपीएससी नागरी सेवा परीक्षेला बसतात. ही परीक्षा देशातील सर्वात आव्हानात्मक स्पर्धात्मक परीक्षा मानली जाते. यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचा वापर भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय पोलिस सेवा (आयपीएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस), रेल्वे गट ए (भारतीय रेल्वे लेखा सेवा), भारतीय टपाल सेवा, भारतीय टपाल सेवा, भारतीय व्यापार सेवा आणि इतर सेवांमध्ये निवड करण्यासाठी केला जातो. यूपीएससी नागरी सेवा परीक्षा तीन टप्प्यात घेतली जाते: प्राथमिक, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. मुख्य परीक्षा आणि मुलाखतीतील कामगिरीच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा