ताज्या बातम्या

Scholarship Exam : पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेबाबत महत्वाची बातमी, अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ!

राज्यात शिष्यवृत्ती परीक्षेचा जोर विद्यार्थ्यंमध्ये दिसत आहे. शाळांमध्ये पाचवी तसेच आठवीच्या वर्गामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी त्यांचा सराव घेतला जात आहे.

Published by : Varsha Bhasmare

राज्यात शिष्यवृत्ती परीक्षेचा जोर विद्यार्थ्यंमध्ये दिसत आहे. शाळांमध्ये पाचवी तसेच आठवीच्या वर्गामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी त्यांचा सराव घेतला जात आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तयार करण्यामागे शाळा कोणतीही कमतरता पडू देत नाही आहे. अशात अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आल्यामुळे, ज्या शाळांना शिष्यवृत्तीच्या परीक्षेसाठी त्यांच्या विद्यार्थ्यांची अद्याप नोंद केली नाही, त्यांना या वाढलेल्या मुदतीचा चांगलाच लाभ होणार आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन २२ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या शैक्षणिक मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही शैक्षणिक परीक्षेचे आयोजन केले आहे. आता अर्ज करण्याची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. एकंदरीत, विद्यार्थ्यांना डिसमेंबरच्या १५ तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे हीच तारीख हीच शाळा नोंदणी आणि विद्यार्थ्यांची नियमित शुल्कासह नोंदणीसाठी अंतिम मुदत असणार आहे.

अर्ज भरायचा तरी कुठे? : शिष्यवृत्ती परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी www.mscepune.in या किंवा puppssmsce.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच मंडळाद्वारे विलंब शुल्काच्या तारखाही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. विलंब शुल्कासह मुदत १६ डिसेंबर ते २३ डिसेंबर निश्चित करण्यात आले आहे. तर अतिविलंब शुल्कासह तारीख २४ डिसेंबर ते २७ डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे. तर त्याहून उशीर केल्यास उमेदवारांना अतिविशेष विलंब शुल्क भरावे लागेल आणि ती भरण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत असेल.

महत्वाची सूचना अशी आहे की ३१ डिसेंबरनंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे १५ डिसेंबर आधीच ठराविक अर्ज शुल्कासह अर्जाची नोंदणी करणे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी सोयीचे ठरेल. ही सर्व माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा