ताज्या बातम्या

Nobel Peace Prize 2023: तुरुंगात असलेल्या नर्गेस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर

Nobel Peace Prize अर्थात नोबेल शांतता पुरस्कार हा अशा व्यक्ती आणि संस्थांना दिला जातो, जे त्यांच्या देशातील समाजातील गरजूंचे प्रतिनिधित्व करतात. तसेच नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्याच्या प्रचार करत शांततेची शिकवण जगाला देतात.

Published by : shweta walge

यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार नर्गिस मोहम्मदी यांना जाहीर करण्यात आला. महिलांवरील अत्याचाराविरुद्धच्या लढ्याबद्दल त्यांना 2023 चा नोबेल शांती पुरस्कार देण्यात आला आहे.

इराणमधील महिलांच्या हक्कासाठी काम केलेल्या नरगिस यांना सरकारने अटक केली होती. इराण सरकारच्या विरोधात प्रपोगंडा पसरवण्याच्या आरोपाखाली त्यांना 31 वर्षे तुरुंगवास आणि 154 चाबकाचे फटके अशी शिक्षा सुनावण्यात आली होती. 51वर्षांच्या नरगिस या अजूनही इराणमधील तुरुंगात कैद आहेत.

नरगिस या डिफेंडर ऑफ ह्यूमन राईट सेंटर या संस्थेच्या उपप्रमुख आहेत. 2003 सालच्या नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या शिरीन एबादी यांनी या संस्थेची स्थापना केली होती. नरगिस यांना आतापर्यंत 13 वेळा अटक करण्यात आली आहे, तर पाच वेळा त्यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. नरगिस यांनी व्हाइट टॉर्चर नावाचं एक पुस्तकही लिहिलं आहे.

दरम्यान, Nobel Peace Prize अर्थात नोबेल शांतता पुरस्कार हा अशा व्यक्ती आणि संस्थांना दिला जातो, जे त्यांच्या देशातील समाजातील गरजूंचे प्रतिनिधित्व करतात. तसेच नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्याच्या प्रचार करत शांततेची शिकवण जगाला देतात. कोणत्याही दोन गटातील संघर्ष रोखण्यासाठी आणि मानवी हक्कांचे रक्षण करण्याचा प्रयत्न करणार्‍यांना दिला जाणारा हा शांतता पुरस्कार यंदा महिलांवरील अत्याचाराविरुद्धचा लढा आणि मानवाधिकारांसाठी काम केल्याबद्दल नर्गिस मोहम्मदी यांना जाहीर झाला आहे. 

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : Independence Day 2025 : आज भारत देशाचा 79 वा स्वातंत्र्यदिन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण

Latest Marathi News Update live : तरुणांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा; एक लाख कोटींची नवी योजना

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरला आज 100 दिवस पूर्ण

Gallantry Awards : 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये शौर्य गाजवणाऱ्या 36 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर