ताज्या बातम्या

यासीन मलिकच्या शिक्षेस इम्रान खानचा विरोध

माजी क्रिकेटरने केला विरोध

Published by : Team Lokshahi

जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट या प्रतिबंधित संघटनेचा प्रमुख यासीन मलिक (Yasin Malik)याला दिल्लीतील एनआयए न्यायालय (NIA Court) शिक्षा देणार आहे. यासीन मलिकने सुनावणीदरम्यान काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याची कबुली दिली होती. दुसरीकडे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खानसह अनेक पाकिस्तानी नेत्यांनी यासीनच्या शिक्षेला विरोध केला आहे. माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने तर या प्रकरणात संयुक्त राष्ट्राकडे हस्पक्षेप करण्याची मागणी केली आहे.

पाकिस्तानचे माजी PM इम्रान खानने यासीन मलिकला शिक्षा देण्यास विरोध केला आहे. इम्रानने लिहिले आहे की, काश्मिरी नेता यासिन मलिकविरोधात मोदी सरकारच्या फॅसिस्ट रणनीतीचा मी तीव्र निषेध करतो. यासीन मलिकला बेकायदेशीर शिक्षा दिली जात आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने मोदी सरकारच्या कारवाईला विरोध केला पाहिजे.

यांनाही शिक्षा

10 मे रोजी झालेल्या मागील सुनावणीत न्यायालयाने म्हटले होते की, स्वातंत्र्याच्या नावाखाली जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी आणि इतर बेकायदेशीर कारवाया करण्यासाठी मलिकने जगभरातून निधीच्या नावाखाली पैसे घेतले. फारुख अहमद दार उर्फ ​​बिट्टा कराटे, शब्बीर शाह, मसरत आलम, मोहम्मद युसूफ शाह, आफताब अहमद शाह, अल्ताफ अहमद शाह, नईम खान, मोहम्मद अकबर खांडे, राजा मेहराजुद्दीन कलवाल, बशीर अहमद भट, जहूर अहमद शाह वताली, शब्बीर अहमद शाह अब्दुल रशीद शेख, नवल किशोर कपूरसह इतर काश्मिरी फुटीरतावादी नेत्यांवर औपचारिकपणे आरोप निश्चित करण्यात आले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा