Sharad Pawar vs Ajit Pawar : नांदेड जिल्ह्यात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तालुका अध्यक्षासह पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश घेतला आहे.
नांदेड जिल्ह्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातील तालुका अध्यक्ष ऍड अंकुश देसाई ,तालुका महिला अध्यक्षा तारकेश्वरी पाटील यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी यांनी पक्षप्रवेश केला आहे. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यापेक्षाही अनेक दिग्गज अजित पवार गटात प्रवेश करणार असून, नांदेड जिल्हा राष्ट्रवादीमय होणार असल्याची ग्वाही आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली आहे.