ताज्या बातम्या

Kolhapur Crime News : पत्नीच्या अनैतिक संबंधातून पतीचा खून, आठ तासांत पोलिसांकडून तपास फत्ते

पत्नी व चुलत दीराच्या कटामुळे पतीचा निर्घृण खून: कोल्हापूर पोलिसांचा तपास यशस्वी

Published by : Team Lokshahi

कोल्हापूरKolhapur जिल्ह्यातील कागल तालुक्यात एका धक्कादायक घटनेत पतीचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. वडगाव येथे शुक्रवारी सकाळी रस्त्याच्या कडेला एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. मृत व्यक्तीचे नाव शिवाजी बंडा शिंदे (वय ४७, रा. वडगाव) असे असून, त्यांच्या डोक्यात गंभीर वार झाल्याचे आढळून आले. प्रथमदर्शनी अपघात वाटावा असा आभास निर्माण करण्यात आला होता, मात्र पोलिसांच्या चौकशीत हे प्रकरण खुनाचे असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी केवळ आठ तासांत या गुन्ह्याचा छडा लावत संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. चौकशीतून धक्कादायक बाब समोर आली असून, पत्नी कांचन शिंदे व तिचा चुलत दीर चंद्रकांत शिंदे यांच्यातील अनैतिक संबंधामुळेच हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. गुरुवारी रात्री धार्मिक कार्यक्रमामुळे गावकरी उशिरापर्यंत बाहेर होते. त्याच रात्री शिवाजी शिंदे आपल्या कामानिमित्त बाहेरून गावात परतले होते. त्यानंतरच्या काही तासांतच त्यांचा खून करून मृतदेह निर्जनस्थळी टाकण्यात आला होता. स्थानिकांनी सकाळी मृतदेह पाहून पोलिसांना माहिती दिली.

चौकशीतून समजले की, कांचन व चंद्रकांत यांनी महिला बचत गटातून घेतलेले पैसे परत न केल्यामुळे शिवाजी शिंदे यांच्याशी वारंवार वाद होत होते. यामुळे दोघांनी कट रचून शिवाजी यांना निर्जन ठिकाणी नेले व लाकडी ओंडक्याने डोक्यावर व चेहऱ्यावर मारून ठार केले. नंतर मृतदेह ओळखू येऊ नये म्हणून रस्त्याच्या कडेला टाकल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. सध्या दोघांनाही मुरगूड पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा नोंदवला असून, अधिक तपास सुरू आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा