Diogo Jota Dies : स्पेनमधील एका दुर्दैवी अपघातात लिव्हरपूल आणि पोर्तुगाल संघाचा प्रसिद्ध आघाडीचा खेळाडू डिओगो जोटा याचे निधन झाले आहे. जोटा आपल्या भावासोबत कारमध्ये प्रवास करत असताना त्यांचा अपघात झाला. या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला असून वय अनुक्रमे 28 आणि 26 वर्षे होते, असे तेथील स्थानिक प्रशासनाने जाहीर केले आहे. अपघातात कारला आग लागल्याने ती आसपासच्या झाडाझुडपांपर्यंत पसरली, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
डिओगो जोटा यांच्या निधनानंतर संपूर्ण फुटबॉल विश्वात शोक व्यक्त केला जात आहे. प्रिमियर लीग आणि लिव्हरपूल एफसी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दुःख व्यक्त केले. लिव्हरपूलने लिहिले की, “या अपघातामुळे फुटबॉल क्लब शोकसागरात बुडाला आहे.” तर प्रिमियर लीगने जोटा व त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करत त्यांना 'फुटबॉलमधील एक चॅम्पियन' म्हणून श्रद्धांजली वाहिली.
डिओगो जोटाची फुटबॉल कारकीर्द पोर्तुगालच्या पाकोस दे फेरेरा क्लबपासून सुरू झाली होती. 2016 मध्ये त्याने स्पॅनिश क्लब अॅटलेटिको माद्रिदमध्ये प्रवेश घेतला, मात्र तिथे खेळण्याची संधी न मिळाल्याने तो पुन्हा पोर्तोला परतला. नंतर वॉल्व्हरहॅम्प्टन (Wolves) क्लबकडून दोन वर्षे खेळून त्याने लिव्हरपूलकडे प्रवेश घेतला.
लिव्हरपूलकडून खेळताना त्याने अनेक महत्त्वाचे सामने खेळले आणि 2024-25 च्या हंगामात संघाला प्रिमियर लीगचे विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. याशिवाय, पोर्तुगालकडून युरो 2022 आणि 2024 मध्ये त्याने सहभाग घेतला होता. नुकत्याच पार पडलेल्या UEFA Nations League स्पर्धेतही तो विजयी पोर्तुगाल संघाचा भाग होता.त्याचे अचानक झालेले निधन संपूर्ण फुटबॉल जगतात एक मोठी शोकांतिका
हेही वाचा...