ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना बदनामीची धमकी देत खंडणीची मागणी केली होती. या प्रकरणी पोलिसांनी एकूण 12 जणांना नोटीस बजावली होती. त्यामध्ये माजी आमदार प्रभाकर घारगे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांचा समावेश होता. घारगे यांची चौकशी वडूज पोलिसांनी केली. परंतू त्याच चौकशीला रामराजे नाईक निंबाळकर हे उपस्थित नव्हते.
साताऱ्यातील वडूज पोलीस स्टेशनचे पथक आज सकाळी 11 वाजता चौकशीसाठी रामराजे निंबाळकरांच्या फलटणच्या निवासस्थानी दाखल झाले. मात्र, रामराजे नाईक निंबाळकर निवासस्थानी हजर नव्हते. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे बंधू संजय नाईक निंबाळकर पोलीस अधिकाऱ्यांना भेटले.