सचिन बडे, छत्रपती संभाजीनगर
बारावी बोर्ड परीक्षेत गैरप्रकार झाल्यास केंद्रासह शाळेची मान्यता कायमची रद्द करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावी बोर्डाच्या लेखी परीक्षेस 11 फेब्रुवारीपासून तर दहावीच्या लेखी परीक्षेस 21 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.
या परीक्षा कॉपीमुक्त पार पडाव्या यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून यासाठी आता बारावी बोर्ड परीक्षेत गैरप्रकार झाल्यास केंद्रासह शाळेची मान्यता कायमची रद्द करण्यात येणार आहे.
त्यामुळे आता कॉपी केस किंवा गैरप्रकार आढळल्यास परीक्षा केंद्रासह शाळेची मान्यता कायमची रद्द करण्यात येईल, असे स्पष्ट आदेश राज्य मंडळाने दिले आहेत.