छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील शिवना नदीपात्रातून केवळ 63 लाखांच्या रॉयल्टीमध्ये मिळालेल्या वाळू उपसण्याच्या ठेक्याच्या आडून तब्बल 27 कोटी रुपयांची वाळू अवैधपणे उपसली गेल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) आणि त्यांच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप होत असून, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी कडक पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.
काय आहे प्रकरण?
जलजीवन मिशन आणि वॉटर ग्रीड योजनेसाठी MJP ला गंगापूर तालुक्यातील सनव येथील राखीव वाळू पट्ट्यातून 9600 ब्रास वाळू उपसण्याचा ठेका जिल्हा प्रशासनाकडून 63 लाख 60 हजार रुपयांच्या रॉयल्टीसह मंजूर करण्यात आला होता. मात्र, एसडीओ संतोष गोरड यांच्या अहवालानुसार, ठेकेदाराने तब्बल १८ हजार ब्रास वाळू जास्त उपसली, ज्याची बाजारमूल्ये सुमारे 27 कोटी रुपये इतकी आहे, हा महसूल थेट शासनाच्या तिजोरीला गालबोट लावणारा आहे.
या अहवालावर तातडीने कारवाई करत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता कोळी यांना फैलावर घेतले. तसेच संबंधित ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. ठेका MJP ने घेतला, पण प्रत्यक्षात उपसा दुसऱ्याच ठेकेदाराने केला. कोणतीही अधिकृत नोंद नाही.
हेही वाचा