ताज्या बातम्या

Water Issue Supply : ऐकावं ते नवलचं! जलवाहिनीमध्ये उंदीर अडकल्याने छत्रपती संभाजीनगरात पाणीपुरवठा ठप्प

जलवाहिनी उंदीर: छत्रपती संभाजीनगरात उंदरामुळे पाणीपुरवठा ठप्प, नागरिक त्रस्त.

Published by : Team Lokshahi

छत्रपती संभाजीनगर शहरात उन्हाळ्यात राजकारणामुळे नागरिकांना 12-14 दिवसांआड पाणी मिळत होते, आता पावसाळ्यात उंदराने पाणीपुरवठा थांबवला आहे. ऐकायला विचित्र वाटेल, पण फारोळा पंपगृहातील डीपीत अडकलेल्या मोठ्या उंदरामुळे स्पार्क होऊन संपूर्ण यंत्रणा ठप्प झाली. त्यामुळे तब्बल 9 तास शहरात पाणीपुरवठा बंद राहिला. शुक्रवार, 13 जून रोजी पहाटे 4.45 वाजता फारोळा येथील इनकमर-2 डीपीमध्ये स्पार्किंग झाले. तपासणी केली असता, त्या डीपीमध्ये मोठा उंदीर अडकलेला आढळून आला. परिणामी 100 एमएलडी क्षमतेचे पंप बंद पडले. 1200 मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी कोरडी पडली. महापालिकेकडे तज्ज्ञ कर्मचाऱ्यांचा अभाव असल्यामुळे खासगी मदतीचा आधार घ्यावा लागला.

महापालिकेच्या यांत्रिकी विभागाचे प्रभारी अभियंता दत्तात्रय गायकवाड यांनी तातडीने खासगी कर्मचारी बोलावले. उंदीर काढून डीपीची चाचणी घेण्यात आली, मात्र वीज उपकेंद्रात वीज पुरवठा स्थिर होत नव्हता. अखेर दुपारी 12.40 वाजता पहिला पंप सुरू करण्यात आला. या कालावधीत सिडको, हडको आणि अन्य भागांत पाणीपुरवठा होऊ शकला नाही. महापालिकेच्या माहितीनुसार, ज्या भागात काल टप्पा पूर्ण होऊ शकला नाही, तिथे आज शनिवार, 14 जून रोजी पाणीपुरवठा केला जाणार आहे.

संभाजीनगर शहरासाठी नवी पाणीपुरवठा योजना मागील पाच वर्षांपासून सुरू आहे. मात्र विविध कारणांमुळे हे काम वेळेत पूर्ण होऊ शकलेले नाही. यंदाच्या उन्हाळ्यातही वारंवार बिघाड, वीजपुरवठा खंडित होणे. पावसाळ्यात उंदरामुळे ठप्प झालेला पुरवठा यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा