सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेक तरुण-तरुणी धोकादायक स्टंट करताना दिसतात. अशीच एक धक्कादायक घटना जामखेडमध्ये घडली आहे. फाशीची रील बनवण्याच्या प्रयत्नात एक युवक प्रत्यक्षात फाशीत अडकून गेला. प्रकाश भीम बुडा असे या युवकाचे नाव आहे. प्रकाश एका हॉटेलमध्ये वेटरचं काम करतो. जामखेड-करमाळा रोडवर जामखेडजवळ खटकळीच्या रोडवर प्रकाश गेला होता.
त्यावेळी त्याने फाशीचं नाटक करणारी रील काढण्यास सुरुवात केला. यासाठी त्याने आपला फोन त्याच्या सोबत असणाऱ्या व्यक्तीच्या हातात दिला आणि व्हिडिओ काढण्यास सांगितला. फाशीचं हे नाटक आणि रील्सची मस्ती प्रकाशला नडली आणि त्याला खरचं फास लागला. यावेळी रील काढणाऱ्याने सामाजिक कार्यकर्ते कोठारी यांना वेळीच संपर्क साधल्याने त्याचा जीव सुदैवाने वाचला.