कल्याणमधील श्रीमती कांताबेन शांतीलाल गांधी शाळेत धार्मिक आस्था दुखावत असल्याचे समोर आले आहे. धार्मिक सहिष्णुता जपण्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांनी टिळा,टिकली लावल्यास अथवा हातात धागा, बांगडी घातल्यास त्यांना शिक्षा देण्यास येईल असा अजब फतवा या शाळेने काढला. यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांचा संताप अनावर झाल्याने त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे तक्रार केली.
यानंतर आम्ही कुठला फतवा काढला नाही. शाळेत धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी फक्त सूचना दिल्या. अशी भूमिका शाळा प्रशासनाने मांडली आहे. कडा व बांगडीने इजा होऊ नये यासाठी आम्ही ते बंद केलेले आहे. त्याचबरोबर टिळा धागे यामुळे शाळेत धार्मिक वाद होत असल्याने त्यादेखील काढाव्या अशा सूचना आम्ही पालकांना दिलेले आहेत. असा खुलासा शाळेच्या डायरेक्टर स्वप्नाली रानडे. आणि मुख्याध्यापक संजय पाटील यांनी केला आहे.