Kalyan  Team Lokshahi
ताज्या बातम्या

कल्याणमध्ये धक्कादायक घटना! पतीने केली पत्नीची हत्या

पत्नीच्या प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचा संशय, पोलिसांकडून पतीला अटक

Published by : Sagar Pradhan

अमजद खान। कल्याण: पत्नीवर असलेल्या संशयातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्व परिसरात घडली आहे. पती पत्नीचे भांडण सुरू असताना मध्यस्थी करण्यास गेलेल्या शेजाऱ्यावर देखील चाकूने हल्ला करण्यात आला असून, तो देखील जखमी झाला आहे.

या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात आरोपी सुनील शिंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून त्याला ताब्यात घेतलं आहे. तर जखमी झालेले परब याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे .पत्नीचे प्रेमप्रकरण असल्याच्या संशयातून सुनील शिंदे याने ही हत्या केली असावी असा संशय पोलिसांकडून व्यक्त करत पोलिस पुढील तपास करत आहेत.

कल्याण पूर्वेकडील तिसगाव पाडा परिसरात सुनील शिंदे आपल्या पत्नीसह राहतात. सुनीलला त्याच्या पत्नीवर असलेल्या संशयातून सुनील आणि त्याच्या पत्निमध्ये सारखे वाद होत होते.आज सकाळच्या सुमारास दोघांमध्ये भांडण झाले. संतापाच्याभरात पती सुनीलने चाकूने ने पत्नीवर हल्ला केला.

याच, दरम्यान त्यांच्या शेजारी राहणाऱ्या परब नावाच्या तरुणाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुनीलने संतापाच्याभरात परबवर चाकूने हल्ला केला. जखमी झालेल्या परबने याबाबत कोलशेवाडी पोलिसांना माहिती दिली. कोळशेवाडी पोलिसांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत सुनील याला ताब्यात घेतलं. या हल्ल्यात सुनील यांची पत्नी मृत पावली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद