लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2024' या विशेष कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली.यावेळी त्यांनी सरकारने दोन वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला.
यावेळी त्यांनी लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजना, लाडक्या भावांसाठी सुरू केलेली मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास योजना, मुलींसाठी सुरू केलेली मोफत उच्च शिक्षण योजना, महिलांसाठी सुरू केलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला. तसेच शेती, उद्योग, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा याबाबतही माहिती दिली.