ताज्या बातम्या

Nashik : गोपीचंद पडळकरांच्या सभेत झळकले लॉरेन्स बिश्नोईचे बॅनर, मुख्यमंत्र्यांची गंभीर दखल

नाशिक सभा: बिश्नोईचे बॅनर झळकले, मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल, पोलीस सक्रिय.

Published by : Team Lokshahi

पहलगाम येथे दशदवाद्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली होती. या हत्येच्या निषेधार्थ नाशिक शहरातील सिडकोमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची "हिंदू विराट" सभा घेण्यात आली होती. या सभेत नथुराम गोडसे, गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई यांचे फलक दिसल्याने एकच खळबळ उडाली होती. या सभेला मंत्री दादा भुसे,अविष्कार भुसे, शिवसेनेचे दीपक बडगुजर, भाजप चे व्यंकटेश मोरे, यांच्यासह विविध हिंदुत्वनिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

यानंतर सदर या सभेप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याची गंभीर दखल घेतली आहे. याबाबत पुण्यात वक्तव्य केले आहे. त्यानंतर नाशिक पोलीस एक्शन मोड वर आले असून त्यांनी याचा तपास सुरु केला आहे. याप्रकरणी १० ते १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलाला जबरदस्तीने बिष्णोईचा फोटो दिला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या संशयावरून एका अज्ञात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे पोलीस यंत्रणा सक्रिय झाली असून तपास सुरु आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा