सध्या सुरु असलेला वाद म्हणजे कुणाल कामरा याने केलेल्या एकनाथ शिंदे यांच्यावरच्या वादग्रस्त गाण्याचा, या गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. त्याने गायलेल्या गाण्यावरुन शिंदेंच्या शिवसेनेकडून आक्रमकता पाहायला मिळाली. तर विरोधकांकडून कुणाल कामराची पाठराखण करत त्याने केलेली गाण्याच्या माध्यातून टीका ही योग्य असल्याचं म्हटलं.
एकनाथ शिंदेंना पुन्हा एकदा डिवचलं
याचपार्श्वभूमिवर आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला गेला आहे. पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांना डिवचण्यात आले आहे. ठाकरे गटाकडून शिंदेचे व्यंगचित्र असलेले बॅनर लावले आहेत. अलका चौकात हे बॅनर लावण्यात आले असून त्या व्यंगचित्रात एकनाथ शिंदे यांची दाढी ओढत आहे असं दाखवण्यात आले आहे. तसेच बॅनरवर "ठाणे, रिक्षा, चष्मा, दाढी, गुवाहाटी आणि गद्दार या शब्दांना महाराष्ट्रात बंदी आहे का?" असं लिहत प्रश्न विचारण्यात आला आहे.
कुणाल कामरा याला दुसरा समन्स
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात गायलेल्या गाण्यावरून कुणाल कामराच्याविरोधात शिवसेना चांगलीच आक्रमक झाली. खारच्या युनी कॉन्टिनेंटल हॉटेलमधील शोच्या सेटची तोडफोड करण्यात आली असून कुणाल कामराच्या सेटची तोडफोड करण्यात आली. याचपार्श्वभूमिवर कुणालवर खार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर खार पोलिसांनी कुणाल कामरा याच्या माहीम इथल्या राहत्या घरी चौकशीला हजर राहण्यासाठी नोटीस बजावली. त्यानंतर आता पुन्हा एकदा कुणालला दुसरा समन्स देण्यात आला आहे. त्याला १ एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.